Penny Stock | 21 रुपयाचा पेनी शेअर दररोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट करतोय, अल्पावधीत होतेय मजबूत कमाई

Penny Stock | सध्या भारतात सणासुदीचा काळ सुरू झाला आहे. आता दिवाळीच्या काळात भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू होईल, आणि त्यामुळे भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार देखील होतील. याचा सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारावर देखील पाहायला मिळेल. एकीकडे जगभरात आर्थिक मंदीच्या भीतीने गुंतवणूकदारांनी आपले पैसे शेअर बाजारातून काढून घ्यालला सुरुवात केली आहे. Alacrity Securities Share Price
दुसरीकडे भारतीय शेअर बाजारात सुसाट तेजी पाहायला मिळत आहे. असे अनेक शेअर्स आहेत, जे आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून देत आहेत. आज या लेखात आपण असाच एक स्टॉक पाहणार आहोत, याचे नाव आहे, अलेक्रिटी सिक्युरिटी.
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अलेक्रिटी सिक्युरिटी कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 6 नोव्हेंबर 2023 रोजी अलेक्रिटी सिक्युरिटी कंपनीचे शेअर्स 19.95 टक्के वाढीसह 21.16 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील वर्षी 2 डिसेंबर 2022 रोजी अलेक्रिटी सिक्युरिटी कंपनीचे शेअर्स 9.33 रुपये या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर आता या कंपनीचे शेअर्स आपल्या वार्षिक उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहेत. अलेक्रिटी सिक्युरिटी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 37.19 कोटी रुपये आहे.
अलेक्रिटी सिक्युरिटी कंपनीने आपले 2023-24 या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीचे निकाल जाहीर केले आहेत. याकाळात अलेक्रिटी सिक्युरिटी कंपनीने 12615 लाख रुपये ऑपरेशनल महसूल संकलित केला आहे. तर याच काळात कंपनीने एकूण 11500 लाख रुपये खर्च केले आहे. पहिल्या सहामाहीत अलेक्रिटी सिक्युरिटी कंपनीने 757 लाख रुपये निव्वळ नफा कमावला आहे.
अलेक्रिटी सिक्युरिटी ही कंपनी मुख्यतः स्टॉक ब्रोकिंग आणि वित्तीय सेवा फर्म म्हणून काम करत आहे. या कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध आहेत. अलेक्रिटी सिक्युरिटी कंपनीलाग ब्रोकिंग व्यवसायातील 25 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. कंपनीच्या प्रवर्तक गटात हेमांशु मेहता आणि पूजा मेहता सामील आहेत. अलेक्रिटी सिक्युरिटी ही कंपनी आपल्या ग्राहकांना इक्विटी आणि इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज, करन्सी फ्युचर्स, म्युच्युअल फंडांमध्ये, व्यापार गुंतवणूक करण्या संबंधित सल्ला देते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Penny Stock Alacrity Securities Share Price 06 November 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं