Penny Stocks | फॅशन सेक्टरमधील 15 रुपयांचा पेनी स्टॉक, कंपनीची भविष्यातील योजना उघड, शेअर मोठा परतावा देऊ शकतो

Penny Stocks| Filatex Fashions Ltd ही स्मॉल कॅप कंपनी आहे. मात्र मागील वर्षभरात परताव्याच्या बाबतीत या कंपनीने मोठ मोठ्या महाकाय कंपन्यांनाही मागे टाकले आहे. मागील वर्षभरात या कंपनीने आपल्या शेअर धारकांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. आता या कंपनीने आणखी काही नवीन घोषणा केल्या आहेत. याचा थेट सकारात्मक परिणाम शेअर धारकांच्या कमाईवर होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊ काय आहे ती घोषणा :
स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीत कंपनीने कळवले आहे की, संचालक मंडळाच्या बैठकीत तीन मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.
1) अधिक फंड गोळा करण्यासाठी सूचीबद्ध, असूचीबद्ध, सुरक्षित, असुरक्षित अशा पर्यायांचा वापर करणे.
2) प्रीमियम सॉक्सच्या उत्पादनास मान्यता देणे.
3) व्यवसायात अधिक विविधता आणणे
संचालक मंडळाच्या सदस्यांच्या या तीन नवीन धाडसी निर्णयांवरून हे स्पष्ट होते की, पुढील येणाऱ्या काळात कंपनी आपला महसूल आणि बाजार विस्तार वाढवण्याची योजना तयार करत आहे. कंपनीचे बाजार भांडवल 150 कोटी रुपये आहे.
Filatex Fashions Ltd या कंपनीच्या शेअरची किंमत शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1.46 टक्क्यांनी पडून 15.73 रुपयांच्या पातळीवर आली होती. मागील 5 वर्षांचे चार्ट पॅटर्न डेटा पाहिले तर आपल्याला कळेल की या कालावधीत कंपनीच्या शेअरच्या किमतीत 339.09 टक्क्यांनी वाढ पाहायला मिळाली होती. त्याच वेळी, 3 वर्षांपूर्वी कंपनीचे शेअर्स खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदाराचा परतावा 463.63 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. मागील एक वर्षात असे दिसून आले आहे की, शेअर बाजारात जेव्हा मोठ्या कंपन्यांचे शेअर्स पडले होते, तेव्हा या पेनी स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 200.97 टक्के परतावा दिला होता. 2022 मध्ये आतापर्यंत या कंपनीच्या शेअरच्या किंमतीत 114.68 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. मागील 6 महिने या कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी चांगले गेले होते. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सची किंमत 127.94 टक्क्यांनी वाढली आहे. एक महिन्यापूर्वी ज्या लोकांनी तेजीत गुंतवणूक केली होती, त्यांना या कालावधीत 69.03 टक्के परतावा मिळाला असेल.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Penny Stock of Filatex Fashions Ltd share price return in investment on 25 October 2022
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं