Penny Stocks | होय! चिल्लर भावातील शेअर्स! या 10 पेनी शेअर्सची यादी नोट करा, अप्पर सर्किट तोडत आहेत

Penny Stocks | चालू आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी भारतीय शेअर बाजारामध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळात होता. सोमवारी BSE सेन्सेक्स इंडेक्स 373.50 अंकांच्या म्हणजेच 0.57 टक्क्यांच्या घसरणीसह 64,949.15 अंकांवर ट्रेड करत होता तर NSE निफ्टी इंडेक्स 130.60 अंकांच्या घसरणीसह म्हणजेच 0.67 टक्क्याच्या घसरणीवसह 19,297.70 अंकांवर ट्रेड करत होता.
शेअर बाजार सुरू झाल्यावर सुरुवातीच्या काही तासात अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त पडझड पाहायला मिळाली होती. यासह अपोलो हॉस्पिटल आणि टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स देखील दोन टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत होते.
अमेरिकन शेअर बाजारातील चढ उतारामुळे भारतीय शेअर बाजारात देखील मोठ्या प्रमाणत दबाव पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात अमेरिकन शेअर बाजार आणि भारतीय शेअर बाजार दोन्ही कमजोरीसह क्लोज झाले होते. निफ्टी मिडकॅप आणि निफ्टी स्मॉलकॅ इंडेक्समध्ये मोठ्या प्रमाणात कमजोरी पाहायला मिळाली आहे. मागील आठवड्यात निफ्टी मिडकॅप इंडेक्स 1.34 टक्क्यांच्या घसरणीसह आणि निफ्टी स्मॉलकॅप इंडेक्स 1.8 टक्के घसरणीसह कमजोरीने ट्रेड करत होते.
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुरुवातीच्या काही तासात निफ्टी मेटल, निफ्टी पीएसयू बँक आणि निफ्टी रियल्टी इंडेक्समध्ये मोठ्या प्रमाणत घसरण पाहायला मिळाली होती. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ओएनजीसी, सन फार्मा, डॉ रेड्डीज लॅब हे स्टॉक टॉप गेनर्समध्ये ट्रेड करत होते. तर अदानी ग्रुपचा भाग असलेल्या कंपन्यांचे शेअर्स टॉप लूजर्स लिस्टमध्ये ट्रेड करत होते.
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजार सुरू झाल्यावर सुरुवातीच्या काही तासात 339 शेअर्समध्ये वाढ पाहायला मिळाली होती. तर 1574 कंपन्यांचे शेअर्स तोट्यात म्हणजेच लाल निशाणीवर ट्रेड करत होते. शुक्रवार दिनांक 11 ऑगस्ट 2023 रोजी परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 331 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स खरेदी करून गुंतवणूक केली होती. तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 704 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केली होती.
10 पेनी शेअर्सची यादी नोट करा
* युनिटेक इंटरनॅशनल
* न्यासा कॉर्पोरेशन
* मोनोटाइप इंडिया
* मारुती सिक्युरिटीज
* रामगोपाल पॉलिटेक्स
* जीव्हीके पॉवर
* इनोव्हेटिव्ह आयडियल
* कंटेनर इंटरनॅशनल
* स्टरलाइट कंपोनेंट्स
* जेबीएफ इंडस्ट्रीज
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Penny Stocks for investment on 16 August 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं