Penny Stocks To Buy | शेअरची किंमत 4 रुपये 80 पैसे, एका महिन्यात दिला 100 टक्के परतावा, वेळीच एंट्री घ्या

Penny Stocks To Buy | इंडिया स्टील वर्क्स कंपनीचे शेअर्स मागील एका महिन्यापासून जबरदस्त तेजीत धावत आहे. लोह पोलाद उत्पादन व्यवसायात गुंतलेल्या इंडिया स्टील वर्क्स कंपनीच्या शेअरने मागील काही ट्रेडिंग सेशनपासून गुंतवणूकदारांचे लक्ष आकर्षित केले आहे. मागील एका महिन्यात इंडिया स्टील वर्क्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्के नफा कमावून दिला आहे. India Steel Share Price
एका महिन्यापूर्वी इंडिया स्टील वर्क्स कंपनीचे शेअर्स 2 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 4.37 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज बुधवार दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी इंडिया स्टील वर्क्स स्टॉक 4.80 टक्के वाढीसह 4.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
इंडिया स्टील वर्क्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 173.96 कोटी रुपये आहे. मार्च 2023 महिन्यात इंडिया स्टील वर्क्स कंपनीच्या शेअरने 1.35 रुपये ही आपली नीचांक किंमत पातळी स्पर्श केली होती. मागील 5 दिवसात इंडिया स्टील वर्क्स कंपनीच्या शेअरची किंमत 10 टक्के मजबूत झाली आहे. मागील सहा महिन्यांत इंडिया स्टील वर्क्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 157.06 टक्के परतावा कमावून दिला आहे. YTD आधारे इंडिया स्टील वर्क्स कंपनीच्या शेअरची किंमत 108 टक्के मजबूत झाली आहे.
इंडिया स्टील वर्क्स कंपनीचे शेअर्स 28 वर्षांपूर्वी 75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र त्यानंतर शेअरमध्ये प्रचंड चढ-उतार वाढल्याने शेअरची किंमत 4 रुपयेवर आली होती. इंडिया स्टील वर्क्स कंपनीच्या शेअरने बीएसई इंडेक्सच्या तुलनेत आपल्या गुंतवणूकदारांना 375 टक्के नफा कमावून दिला आहे. इंडिया स्टील वर्क्स कंपनीने आपल्या व्यवस्थापन मंडळात मोठा बदल केला आहे.
इंडिया स्टील वर्क्स कंपनीने माहिती दिली की, रत्ना दीप रंजन यांना कंपनीच्या नॉन- एक्झिक्युटिव्ह आणि इंडिपेंडेंट डायरेक्टर पदाच्या श्रेणीमध्ये अतिरिक्त डायरेक्ट म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. ही नियुक्ती 11 डिसेंबर 2023 पासून लागू झाली आहे. इंडिया स्टील वर्क्स कंपनीमध्ये प्रवर्तकांनी एकूण 50.11 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 49.89 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Penny Stocks To Buy India Steel Share Price NSE Live 27 December 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं