PFC Share Price | मागील एका वर्षात पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन शेअरने गुंतवणूकदारांना 112 टक्के परतावा दिला, आता अजून एक मोठी बातमी

PFC Share Price | पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड या सरकारी मालकीच्या कंपनीचे शेअर्स बुधवार दिनांक 26 जुलै 2023 रोजी आपल्या उच्चांक किंमत पातळीवर पोहोचले होते. आज देखील हा स्टॉक तेजीसह क्लोज झाला आहे.
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी 244.50 रुपये ही 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती. तर स्टॉक 1.72 टक्क्यांच्या वाढीसह 242.35 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज शुक्रवार दिनांक 28 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.63 टक्के वाढीसह 254.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना दुप्पट नफा कमावून दिला आहे. एक वर्षपूर्वी या कंपनीचे शेअर्स 113 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक 254.95 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. मागील एका वर्षभरात पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 112 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2023 या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 61.89 टक्के मजबूत झाले आहेत.
काही दिवसांपूर्वी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने 2.3 लाख कोटी रुपयांच्या मेमोरेंडम ऑफ असोसिएशनवर स्वाक्षरी केली आहे. ही सकारात्मक बातमी येताच गुंतवणूकदारांनी स्टॉक खरेदीला सुरुवात केली. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या 20 आघाडीच्या कंपन्यांसोबत MOU करार संपन्न केला आहे.
PFC ही कंपनी भारतातील अक्षय ऊर्जा निर्मितीला चालना देण्यास वचनबद्ध आहे. या करारात शाश्वत उर्जेच्या स्त्रोतांच्या संपूर्ण श्रेणीसह सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, ग्रीन हायड्रोजन, बॅटरी स्टोरेज, इलेक्ट्रिक वाहन कंपन्या, हरित ऊर्जा उपकरणे इत्यादींचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यां सामील आहेत.
ज्या कंपन्यांसोबत पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडने सामंजस्य करार केला आहे त्यात, अदानी, ग्रीनको, रिन्यू, कॉन्टिन्युम, अवडा, जेबीएम ऑटो, मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, राजस्थान रिन्यूएबल एनर्जी, यासारख्या दिग्गज कंपन्यांचा समावेश आहे.
या कंपन्यांसोबत केलेला हा करार भारताच्या महत्त्वाकांक्षी अक्षय ऊर्जा निर्मिती उद्दिष्टे साध्य करण्याच्या दिशेने एक प्रगतिशील पाऊल आहे. यातून फक्त आवश्यक आर्थिक प्रोत्साहनच नाही तर स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकासाला देखील चालना मिळणार आहे. कंपनीच्या शेअरची वार्षिक उच्चांक पातळी किंमत 260.15 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 100.85 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | PFC Share Price today on 28 July 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं