Polycab Share Price | पैशाने पैसा वाढवा! हा मल्टिबॅगर शेअर अल्पावधीत देईल 75 टक्के परतावा, मोठी कमाई होईल

Polycab Share Price | पॉलीकॅब इंडिया या वायर आणि केबल्स निर्मितीचा व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत मिळत आहेत. तज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 7000 रुपये किमतीवर जाऊ शकतात. म्हणजेच सध्याच्या किमतीवरून पॉलीकॅब इंडिया कंपनीचे शेअर्स 75 टक्क्यांनी वाढू शकतात.
परकीय ब्रोकरेज हाऊस जेफरीजने पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 7000 रुपये टारगेट प्राईस जाहीर केली आहे. आज मंगळवार दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी पॉलीकॅब इंडिया स्टॉक 2.86 टक्के वाढीसह 4,318.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
नुकताच पॉलीकॅब इंडिया कंपनीवर आयकर विभागाच्या छापा पडला होता. त्यानंतर या कंपनीचे शेअर्स 27 टक्के खाली आले होते. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पॉलीकॅब इंडिया स्टॉक 5 टक्के वाढीसह 4147 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. जेफरीज फर्मने पॉलीकॅब इंडिया स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
परकीय ब्रोकरेज हाऊस जेफरीजने पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर बाय रेटिंग दिली आहे. पॉलीकॅब इंडिया कंपनी आपले चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल 18 जानेवारी 2024 रोजी जाहीर करणार आहे. तिसऱ्या तिमाहीत तांब्याच्या किमतीत वार्षिक आधारावर 2 टक्के वाढ झाली आहे.
ब्रोकरेज हाऊसच्या तज्ञांच्या मते, पॉलीकॅब इंडिया कंपनीच्या विक्रीत वार्षिक आधारावर 15 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. तर ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन वार्षिक आधारावर 40 बेसिस पॉइंट्सने वाढू शकतो. तज्ञांच्या मते, हा स्टॉक अप ट्रेण्डमध्ये 8000 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.
मागील 5 वर्षांत पॉलीकॅब इंडिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 560 टक्के परतावा कमावून दिला आहे. 18 एप्रिल 2019 रोजी या कंपनीचे शेअर्स 640.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 15 जानेवारी 2024 रोजी पॉलीकॅब इंडिया स्टॉक 4147 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Polycab Share Price NSE Live 16 January 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं