Praj Industries Share Price | नितीन गडकरींच्या एका घोषणेमुळे गुंतवणूकदारांना 482 टक्के परतावा देणारा प्राज इंडस्ट्रीज शेअर तेजीत

Praj Industries Share Price | धडाकेबाज निर्णय घेणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकताच एका कार्यक्रमात भाषण देताना म्हंटल होतं की, भारतात लवकरच इथेनॉलवर चालणारी वाहने चालतील. आणि या बातमीनंतर शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या इथेनॉल ट्रेडिंग कंपनीच्या शेअरमध्ये वेगवान तेजी पाहायला मिळाली. असाच एक स्टॉक म्हणजे, प्राज इंडस्ट्रीज. आज सोमवार दिनांक 3 जुलै 2023 रोजी प्राज इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 0.29 टक्के वाढीसह 378.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
प्राज इंडस्ट्रीज ही इथेनॉल तंत्रज्ञान सेवा प्रदान करणारी कंपनी आहे. प्राज इंडस्ट्रीज ही कंपनी आपल्या ग्राहकांना जैव इंधन तंत्रज्ञान प्रदान करण्याचे काम करते. सध्या या कंपनीचे भारताबाहेरही अनेक ग्राहक आहेत. भारतातील जवळपास 70 टक्के इथेनॉल बाजारपेठ प्राज इंडस्ट्रीज कंपनीच्या ताब्यात आहे. प्राज इंडस्ट्रीज ही कंपनी भारतातील 70 टक्के 2G इथेनॉल तंत्रज्ञान आणि बाजारपेठेवर नियंत्रण करत आहे.
प्राज इंडस्ट्रीज ही कंपनी एकटी जगातील 10 टक्के इथेनॉल उत्पादन करण्याचे काम करते. या स्मॉल कॅप कंपनीचे एकूण बाजार भांडवल 6948 कोटी रुपये आहे. भारताने आपल्या पर्यावरण धोरणात कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा निर्धार जाहीर केला आहे. त्यामुळे पुढील काळात प्राज इंडस्ट्रीज कंपनीला मोठा फायदा मिळू शकतो. भारत सरकार आता इथेनॉलच्या वापरावर अधिक भर देत असल्याने शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या नजरा प्राज इंडस्ट्रीज स्टॉककडे लागले आहेत.
कंपनीची कामगिरी :
मागील आठवड्यात शुक्रवारी प्राज इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 0.15 टक्क्यांच्या घसरणीसह 377.50 रुपयेवर क्लोज झाले होते. 2023 मध्ये आतापर्यंत प्राज इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरची किंमत फक्त 3.31 टक्के वाढली आहे. मागील 3 वर्षात या कंपनीच्या पोझिशनल गुंतवणूकदारांनी 482 टक्क्याहून अधिक परतावा कमावला आहे. तर मागील एका वर्षात प्राज इंडस्ट्रीज कंपनीच्या गुंतवणुकदारांना फक्त 5.89 टक्के परतावा मिळाला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Praj Industries Share Price today on 3 July 2023
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं