Praveg Share Price | मार्ग श्रीमंतीचा! प्रवेग कंपनीची ऑर्डरबुक अजून मजबूत झाली, स्टॉक तेजीत यायेणार

Praveg Share Price | प्रवेग लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरूवारी 10 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. तर आज हा स्टॉक घसरणीसह क्लोज झाला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये प्रवेग लिमिटेड कंपनीने सेबीला कळवले की, कंपनीला लक्षद्वीपमध्ये काम करण्याची मोठी संधी मिळाली आहे. त्यानंतर या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी सुरू झाली. ( प्रवेग लिमिटेड कंपनी अंश )
लक्षद्वीप पर्यटन विभागाने प्रवेग लिमिटेड कंपनीला लक्षद्वीपच्या बांगाराम आणि चित्रकरा बेटांमध्ये 350 तंबूंच्या ऑपरेशन आणि देखभालीचे कॉन्ट्रॅक्ट दिले आहे. आज शुक्रवार दिनांक 15 मार्च 2024 रोजी प्रवेग लिमिटेड स्टॉक 1.99 टक्के घसरणीसह 910.40 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.
प्रवेग लिमिटेड कंपनी लक्षवद्वीपमधील बंगाराम बेटावर 150 टेन्ट आणि थिनाकारा येथे 200 टेन्ट उभारणार आहे. आणि त्यांचे संचालन तसेच देखरेखीचे काम करणार आहे. याशिवाय प्रवेग लिमिटेड कंपनी लक्षद्वीप बेटावर स्कूबा डायव्हिंग, डेस्टिनेशन वेडिंग, कॉर्पोरेट फंक्शन्स, खाजगी कार्यक्रम, हेल्थ अँड वेलनेस सेंटर, प्ले एरिया आणि कॉफी शॉप यांसारख्या इतर व्यावसायिक सुविधां देखील सुरू करणार आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी प्रवेग लिमिटेड कंपनीला पाच वर्षांचा कालावधी देण्यात आला आहे. नंतर तो दोन वर्षांपेक्षा जास्त वाढवला जाणार नाही.
प्रवेग लिमिटेड कंपनीने आपल्या निवेदनात म्हंटले आहे की, “आमच्या पर्यावरणपूरक आणि विलासी आदरातिथ्य सेवाद्वारे आम्ही बंगाराम आणि थिनाकारा बेटांचे सौंदर्य आणि सुलभता वाढवण्याचे काम करणार आहोत. आम्ही आमच्या पर्यटकांना टेंट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून एक उत्तम अनुभव प्रदान करण्यास तयार आहोत”
प्रवेग लिमिटेड कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9.08 टक्के वाढीसह 928.9 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. व्यवहारादरम्यान हा स्टॉक 10 टक्क्यांच्या वाढीसह 936.70 रुपये किमतीवर पोहचला होता. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1300 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Praveg Share Price NSE Live 15 March 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं