Rail Vikas Nigam Share Price | हा सरकारी कंपनीचा शेअर अक्षरशः पैशाचा पाऊस पाडत आहेत, 1 दिवसात शेअर 10.42 टक्के वाढला

Railail Vikas Nigam Share Price | ‘रेल विकास निगम लिमिटेड’ या सरकारी मालकीच्या रेल्वे कंपनीचे शेअर्स तुफानी तेजीत आले आहेत. सोमवार दिनांक 3 एप्रिल 2023 रोजी RVNL कंपनीचे शेअर्स 10.42 टक्के वाढीसह 75.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ‘रेल विकास निगम’ कंपनीच्या शेअर्समध्ये ही तुफानी तेजी ऑर्डर्सची प्राप्ती झाल्याने पाहायला मिळाली आहे. RVNL कंपनीला 721 कोटी रुपये मूल्याचे ऑर्डर प्राप्त झाले आहेत. ‘रेल विकास निगम लिमिटेड’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 84.15 रुपये होती. (Railail Vikas Nigam Limited)
‘रेल विकास निगम लिमिटेड’ कंपनीला ‘एलिव्हेटेड कोना एक्स्प्रेस वे’ च्या बांधकामाची ऑर्डर देण्यात आली आहे. सेबी फाइलिंगमध्ये कंपनीने म्हटले आहे की, ‘रेल विकास निगम लिमिटेड’ कंपनीने ‘भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण’ ने मागवलेल्या निविदेमध्ये सर्वात कमी बोली लावली होती. या कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग-117 च्या 0.145 किलोमीटर ते 7.337 किलोमीटर पर्यंत सहा लेनचा एलिव्हेटेड कोना एक्सप्रेसवे बांधण्याचे नियोजित आहे. हे पूर्ण बांधकाम ईपीसी पद्धतीने केले जाईल. या प्रकल्पाचे अंदाजित मूल्य 720.67 कोटी रुपये आहे.
RVNL कंपनीच्या संयुक्त उपक्रमाला ‘वंदे भारत ट्रेन’ च्या संचाच्या निर्मिती आणि देखभालीसाठी’ रेल्वे मंत्रालय’ कडून LOA देण्यात आले आहे. या प्रकल्पामध्ये सरकारी उत्पादन युनिट आणि ट्रेन सेट डेपोचे अपग्रेड करण्याचे काम देखील नियोजित आहे. वंदे भारत ट्रेनच्या एकूण संचांची संख्या 120 असून प्रत्येक संचाची किंमत 120 कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. ‘रेल विकास निगम लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षांत RVNL कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 375 टक्के परतावा कमावून दिला आहे.
ब्रोकरेज फर्म प्रभुदास लिल्लाधरने ‘रेल विकास निगम लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सवर ‘बाय’ रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने RVNL कंपनीच्या शेअर्ससाठी 78 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. प्रभुदास लिलाधर फर्मने RVNL कंपनीच्या स्टॉकवर 64 रुपये स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. ‘रेल विकास निगम लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 29 रुपये होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Rail Vikas Nigam Share Price on 04 April 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं