RailTel Share Price | रेलटेल कॉर्पोरेशन शेअर तुफान तेजीत परतावा दिला, पुढेही मल्टिबॅगर परतावा देणार?

RailTel Share Price | रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये सलग काही दिवसाच्या घसरणीनंतर सुधारणा पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 385.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे.
नुकताच रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीला प्रसार भारती ब्रॉडकास्टिंग कंपनीकडून OTT प्लॅटफॉर्म संबंधित कामाची एक ऑर्डर मिळाली आहे. त्यामुळे या कंपनीचे शेअर्स तेजीत आले आहेत. आज गुरूवार दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया स्टॉक 1.67 टक्के वाढीसह 382.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीने आपल्या एका निवेदनात माहिती दिली की, कंपनीला प्रसार भारती ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीकडून डिझाईन, विकास, अंमलबजावणी, ऑपरेशन आणि देखभाल यासाठी कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले आहे. या कॉन्ट्रॅक्टचे एकूण मूल्य 139.73 कोटी रुपये आहे.
मागील सहा महिन्यांत रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 126.83 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 223.61 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सने परताव्याच्या बाबतीत बेंचमार्क निफ्टी-50 इंडेक्सला देखील मागे टाकले आहे. रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 459.30 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 96.20 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 12,075.3 कोटी आहे.
नुकताच रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीने आपले डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहे. 31 डिसेंबर 2023 रोजी संपलेल्या तिमाहीत रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीच्या महसुलात 47 टक्क्यांची वाढ झाली आहे. मागील वर्षीच्या डिसेंबर तिमाहीत या रेल्वे कंपनीने 454 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर या चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत कंपनीने 668 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. या डिसेंबर 2023 तिमाहीत रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीने मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 93 टक्के वाढीसह 62 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीने 32 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | RailTel Share Price NSE Live 15 February 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं