Rama Steel Tubes Share Price | या शेअरने अल्पावधीत लोकांचे पैसे अनेक पट वाढवले, हा पेनी स्टॉक अजूनही वाढत आहे

Rama Steel Tubes Share Price | शेअर बाजारात असे अनेक पेनी स्टॉक आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. मात्र त्यात गुंतवणूक करणे खूप जखमीचे असते. असाच एक स्टॉक म्हणजे, ‘रामा स्टील ट्यूब्स लिमिटेड’. लोह-पोलाद संबंधित व्यापार करणाऱ्या या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना कमालीचा परतावा मिळवून दिला आहे. बीएसई निर्देशांकावर ‘रामा स्टील ट्यूब्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअरची किंमत 5 टक्के वाढीसह 27.84 रुपये किमतीवर पोहचली होती. ‘रामा स्टील ट्यूब्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 46.10 रुपये होती. एक वर्षापूर्वी म्हणजेच 31 मार्च 2022 रोजी ‘रामा स्टील ट्यूब्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 12.24 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,296.85 कोटी रुपये आहे. एप्रिल 2020 मध्ये ‘रामा स्टील ट्यूब्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअरची किंमत 1 रुपयांपेक्षा कमी होती. (Rama Steel Tubes Limited)
गुंतवणुकीवर परतावा :
‘रामा स्टील ट्यूब्स’ कंपनीच्या शेअर्सने सेन्सेक्स इंडेक्सच्या तुलनेत मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 120 टक्के पेक्षा अधिक परतावा मिळवून दिला आहे. त्याचप्रमाणे मागील दोन वर्षांच्या कालावधीत या कंपनीच्या शेअरने लोकांना 880 टक्के परतावा कमावून दिला आहे. याशिवाय मागील तीन वर्षांत ‘रामा स्टील ट्यूब्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 3515.58 टक्के वधारले आहेत.
डिसेंबर तिमाहीचे निकाल :
‘रामा स्टील ट्यूब्स’ ही एक स्ट्रक्चरल स्टील ट्यूब निर्माता कंपनी आहे. या कपनीने डिसेंबर 2022 तिमाहीत 53.21.6 टन सर्वकालीन विक्रमी विक्री नोंदवली होती. आर्थिक वर्ष 2023 च्या पहिल्या नऊ महिन्यांच्या कालावधीत कंपनीच एकूण सेल्स 1,31,824 टन होता. एका वर्षापूर्वी कंपनीने 71,071 टन विक्री केली होती. ‘रामा स्टील ट्यूब्स लिमिटेड’ कंपनीने 31 डिसेंबर 2022 रोजी तिमाही कालावधीत 35 कोटी रुपये महसूल संकलित केला होता, त्यात कंपनीने 7.4611 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Rama Steel Tubes Share Price on 01 April 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं