Ramkrishna Forgings Share Price | रामकृष्ण फोर्जिंग्ज शेअरमध्ये गुंतवणूक करण्याची सुवर्णसंधी, शेअर पुढील काळात तेजीत येणार

Ramkrishna Forgings Share Price | रामकृष्ण फोर्जिंग्ज कंपनीच्या शेअर्समध्ये एका दिवसात 7 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. त्यानंतर या कंपनीच्या शेअरने इंट्रा-डे ट्रेडमध्ये 440 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती. रामकृष्ण फोर्जिंग्ज कंपनीच्या शेअर्समध्ये वाढीचे प्रमुख कारण म्हणजे, युरोप आणि भारतीय रेल्वे मंत्रालयाकडून कंपनीला मोठी वर्क ऑर्डर मिळाली आहे. ही बातमी येताच गुंतवणूकदारांनी रामकृष्ण फोर्जिंग्ज कंपनीचे शेअर्स खरेदी करायला सुरुवात केली.
ऑर्डर तपशील
रामकृष्ण फोर्जिंग्स कंपनीला युरोपमधून 4.5 दशलक्ष युरोची वर्क ऑर्डर प्राप्त झाली आहे. तर या कंपनीला ही ऑर्डर पुढील 2 वर्षात पूर्ण करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. रामकृष्ण फोर्जिंग्स कंपनीला या वर्क ऑर्डर अंतर्गत रेल्वेचे डबे बनवायचे काम देण्यात आले आहे.
रामकृष्ण फोर्जिंग्ज कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, युरोप व्यतिरिक्त रामकृष्ण फोर्जिंग्स कंपनीला भारतीय रेल्वे मंत्रालयाकडून देखील वंदे भारत ट्रेनची एक मोठी ऑर्डर देण्यात आली आहे. या ऑर्डरमध्ये Titagarh Rail Systems Ltd देखील भागीदार म्हणून काम करणार आहे. या वर्क ऑर्डरचे मूल्य 12,226.50 कोटी रुपये आहे.
मागील एका वर्षात रामकृष्ण फोर्जिंग्ज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 158 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2023 मध्ये आतापर्यंत रामकृष्ण फोर्जिंग्ज कंपनीच्या शेअरची किंमत 57 टक्क्यांनी वाढली आहे. तर गुंतवणूकदारांसाठी चांगली गोष्ट म्हणजे मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने लोकांना 22 टक्के नफा मिळवून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 145.50 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Ramkrishna Forgings Share Price today on 17 June 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं