RBI To Modi Govt | लोकसभा निवडणुकीपूर्वी RBI कडून मोदी सरकारला मोठं गिफ्ट, 87,416 कोटी रुपयांचा लाभांश देण्यास मान्यता

RBI To Modi Govt | भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) 2022-23 या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारला 87,416 कोटी रुपयांचा लाभांश देण्यास शुक्रवारी मान्यता दिली. विशेष म्हणजे मागील आर्थिक वर्षात (आर्थिक वर्ष २०२२) लाभांश देण्याच्या जवळपास तिप्पट आहे.
2021-22 मध्ये लाभांश 30,307 कोटी रुपये होता. गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाच्या ६०२ व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आपत्कालीन जोखीम बफर ६ टक्के ठेवण्याचा निर्णय घेताना संचालक मंडळाने २०२२-२३ या लेखा वर्षासाठी ८७,४१६ कोटी रुपयांचा अनुशेष केंद्र सरकारकडे हस्तांतरित करण्यास मान्यता दिली आहे.
वार्षिक अहवाल व हिशेबही मंजूर
रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाने २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी आरबीआयच्या कामकाजाचा आढावा घेतला आणि वार्षिक अहवाल आणि खात्यांना मंजुरी दिली.
RBI approves Rs 87,416 crore dividend payment to government for 2022-23 against Rs 30,307 crore in FY22: Statement
— Press Trust of India (@PTI_News) May 19, 2023
आरबीआयचा लाभांश नेमकं काय आहे?
कंपन्या त्यांच्या नफ्यातील काही भाग वेळोवेळी भागधारकांना देतात. नफ्याचा काही भाग लाभांशाच्या स्वरूपात दिला जातो. त्याचप्रमाणे रिझर्व्ह बँकही आपल्या नफ्यातील काही भाग केंद्र सरकारला देते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: RBI To Modi Govt RBI approves Rs 87416 crore dividend payment to government for 2022-23 details on 19 May 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं