Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर धमाका करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मिळेल तगडा परतावा

Reliance Share Price | भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर अफाट तेजीत धावत आहेत. बुधवारी इंट्रा डे ट्रेडमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 4 टक्के वाढीसह 3037 रुपये किमतीवर पोहोचला होता. तर आज शुक्रवारच्या व्यवहारात देखील या शेअरमध्ये भरघोस तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 3027.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश )
रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समधील वाढीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी इंडेक्स जबरदस्त तेजीत आले होते. जून 2024 या महिन्यात रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉकची कामगिरी चढ-उतारांनी भरलेली होती. निवडणूक निकालानंतर या कंपनीचे शेअर्स प्रचंड घसरले होते. मात्र त्यानंतर हा स्टॉक विक्रीच्या दबावातून सावरला. आज शुक्रवार दिनांक 28 जून 2024 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 1.51 टक्के वाढीसह 3,107.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
मागील एका वर्षभरात रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 32 टक्के नफा कमावून दिला आहे. YTD आधारे या कंपनीचे शेअर्स 17 टक्के वाढले आहे. तज्ञांच्या मते, पुढील काही दिवसात हा स्टॉक 3500 रुपये किमतीवर जाऊ शकतो. जागतिक ब्रोकरेज फर्म जेफरीज रिलायन्स कंपनीच्या शेअर्सबाबत उत्साही पाहायला मिळत आहे.
ब्रोकरेज फर्मच्या मते, अल्पावधीत हा स्टॉक 3,380 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचा EBITDA 14 टक्के दराने वाढण्याची अपेक्षा आहे. UBS फर्मच्या मते, रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक पुढील काही दिवसात 3,420 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म नुवामाने रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉकवर 3,500 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Reliance Industries Share Price NSE Live 28 June 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं