Reliance Industries Share Price | या एका निर्णयाचा रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरवर काय परिणाम होणार? महत्वाची अपडेट

Reliance Industries Share Price | परकीय ब्रोकरेज फॉर्म जेफरीजने ‘जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस’ बाबत नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. जेफरीजने आपल्या अहवालात म्हटले आहे की, ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ ने सप्टेंबर 2023 पर्यंत ‘जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस’ IPO साठी आवश्यक मंजूरी प्राप्त करेल. ब्रोकरेज फर्मने सांगितले की, ‘जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस’ कंपनी कर्ज देण्याच्या क्रियाकलापांना त्वरित सुरुवात करेल आणि मालमत्ता व्यवस्थापन, जीवन विमा आणि सामान्य विम्यासाठी त्वरित नियामक मंजुरी प्राप्त करेल. या सर्व मंजुरीसाठी कंपनीला किमान 12-18 महिने कालावधी लागले. (Reliance Industries Limited)
जेफरीजने आपल्या अहवालात म्हटले आहे की, या डिमर्जर आणि स्टॉक लिस्टिंग प्रक्रियेला किमान सहा महिने कालावधी लागू शकतो. याचा परिणाम कंपनीच्या फ्रँचायझी स्थापन करण्यावर होऊ शकतो, कारण यासाठी कंपनीला तंत्रज्ञान विकास, विश्लेषणे आणि पुनर्प्राप्ती प्लॅटफॉर्म निर्माण करावी लागेल. कोणत्याही चुकीच्या हालचालीमुळे पेटीएम, फोनपे आणि बजाज फायनान्स सारख्या दिग्गज कंपन्यांना आयता फायदा मिळू शकतो. जेफरीजने 1 एप्रिल रोजी प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हंटले आहे की, “जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे चेअरमन आणि सीईओ हे ICICI बँकेचे पूर्व अध्यक्ष पदी अनुभव असलेले दिग्गज व्यक्ती आहेत. त्यांच्या या क्षेत्रातील आक्रमक दृष्टिकोनामुळे ग्राहक कर्ज आणि पेमेंट विंडोवर विपरीत परिणाम होऊ शकतो. या सर्व बाबींचा विचार करून तज्ञांनी RIL स्टॉकवर SOTP 3,100 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे.
रिलायन्स कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2331.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 5 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.32 टक्के घसरणीसह 2,324.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील 2 आठवड्यांची कामगिरी पहिली तर, रिलायन्स कंपनीच्या शेअरची उच्चांक किंमत 2856.15 रुपये होती. आणि नीचांक किंमत 2180 रुपये होती. मागील एका वर्षात रिलायन्स कंपनीचे शेअर्स 11.26 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. 5 जुलै 2002 रोजी रिलायन्स कंपनीचे शेअर्स 53.01 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कालावधीत कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 4297 टक्के मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे.
शेअर बाजारातील तज्ञ उत्साही :
मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीच्या शेअरबाबत स्टॉक मार्केट मधील तज्ज्ञ नेहमी सकारात्मक आणि उत्साही असतात. 31 पैकी 26 तज्ञांनी RIL कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यापैकी 15 तज्ञांनी स्टॉकवर ‘स्ट्रॉग बाय’ रेटिंग दिली आहे. दोन तज्ञ स्टॉक तत्काळ विकण्याचा सल्ला देत आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Reliance Industries Share Price on 05 April 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं