Reliance Naval & Engineering Share Price Today | अनिल अंबानींच्या या कंपनीच्या 2 रुपयाच्या शेअरवर रोज अप्पर सर्किट, वाढीचे कारण काय?

Reliance Naval & Engineering Share Price Today | शेअर बाजारात जबरदस्त गोंधळ असताना ‘रिलायन्स नेव्हल अँड इंजिनिअरिंग’ कंपनीच्या शेअरमध्ये सॉलिड ट्रेण्ड पाहायला मिळत आहे. चालू आठवड्यात सलग तीन दिवस या स्टॉकमध्ये अप्पर सर्किट लागत आहे. आज बुधवार दिनांक 19 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.55 टक्के वाढीसह 2.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Reliance Naval & Engineering Limited)
31 मार्च 2023 रोजी ‘रिलायन्स नेव्हल अँड इंजिनिअरिंग’ कंपनीचे शेअर्स 1.61 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. त्याच वेळी, 8 सप्टेंबर 2022 रोजी ‘रिलायन्स नेव्हल अँड इंजिनिअरिंग’ कंपनीच्या स्टॉकने 4.06 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 17.95 टक्के परतावा कमावून दिला आहे. हा स्टॉक पेनी स्टॉक पैकी एक आहे, म्हणून यात गुंतवणूक करणे धोक्याचे ठरू शकते.
‘स्वान एनर्जी’ आणि ‘ हेजहॉग मर्कटाइल’ च्या कन्सोर्टियमने दिवाळखोर उद्योगपती अनिल अंबानींच्या ‘रिलायन्स नेव्हल अँड इंजिनीअरिंग’ कंपनीचे अधिग्रहण करण्यासाठी मोठी रक्कम ऑफर केली आहे. स्वान आणि हेजहॉगया दोन कंपन्यांच्या युतीने कंपनीच्या कर्जदात्यांना ऑफरच्या किमतीचा पहिला हप्ता देण्यासाठी NCLT करून चार महिन्यांचा कालावधी मागितला आहे.
ऑफरनुसार स्वान-हेजहॉग युतीला पहिला हप्ता म्हणून 200 कोटी रुपये जमा करावे लागणार आहे. ‘रिलायन्स नेव्हल अँड इंजिनिअरिंग’ ही कंपनी मुख्यतः जहाजे बांधणी, जहाज दुरुस्ती आणि रिंग या व्यवसायात गुंतलेली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Reliance Naval & Engineering Share Price Today on 19 April 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं