Reliance Power Share Price | 27 रुपयाचा रिलायन्स पॉवर शेअर पुन्हा 'पॉवर' दाखवणार, स्टॉक तेजीचे नेमकं कारण काय?

Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये सलग काही दिवसांच्या घसरणीनंतर सुधारणा पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स पॉवर स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला होता. या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 27.35 रुपये या आपल्या इंट्राडे उच्चांक किंमत पातळीवर पोहोचले होते. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 115 टक्के नफा कमावून दिला आहे. एक वर्षभरापूर्वी या कंपनीचे शेअर्स 12 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 2008 मध्ये रिलायन्स पॉवर स्टॉक 260 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मंगळवार दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 4.99 टक्के वाढीसह 27.35 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
रिलायन्स पॉवर कंपनीने महाराष्ट्रातील 45 मेगावॅट क्षमतेचा पवन ऊर्जा प्रकल्प जेएसडब्ल्यू रिन्यूएबल एनर्जी कंपनीला हस्तांतरित केला आहे. हा प्रकल्प 132.39 कोटी रुपये मूल्यावर जेएसडब्ल्यू रिन्यूएबल एनर्जी कंपनीला हस्तांतरित करण्यात आला आहे. जेएसडब्ल्यू एनर्जीची उपकंपनी असलेल्या जेएसडब्ल्यू रिन्यूएबल एनर्जीने रिलायन्स पॉवर कंपनीच्या मालकीच्या पवन ऊर्जा प्रकल्पाचे अधिग्रहण केले आहे.
रिलायन्स पॉवर कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, जेएसडब्ल्यू रिन्यूएबल एनर्जी ही कंपनी JSW निओ एनर्जी लिमिटेड कंपनीची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. रिलायन्स पॉवर कंपनी त्यांच्याकडून मिळालेली पूर्ण रक्कम आपले कर्ज परतफेड करण्यासाठी खर्च करणार आहे.
या आर्थिक वर्षाच्या अखेरीस रिलायन्स पॉवर कंपनीने कर्जमुक्त होण्याचे लक्ष निर्धारित केले आहे. 31 मार्च 2023 पर्यंत रिलायन्स पॉवर कंपनीवर 700 कोटी रुपये कर्ज होते. मागील तीन महिन्यांत रिलायन्स पॉवर कंपनीने डीबीएस बँक, आयसीआयसीआय बँक आणि ॲक्सिस बँक या तिन्ही बँकाचे कर्ज परतफेड केले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Reliance Power Share Price NSE Live 17 April 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं