Reliance Power Share Price | कर्जमुक्त रिलायन्स पॉवर कंपनीचा 45 रुपयांचा शेअर तेजीत, फायद्याची अपडे - NSE: RPOWER

Reliance Power Share Price | गुरुवार, 02 जानेवारी 2025 रोजी स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी पाहायला मिळाली होती. गुंतवणूकदार आणि एफआयआय’कडून जोरदार खरेदी झाल्याचे पाहायला मिळाले. गुरुवारी एनएसई निफ्टी १२५ अंकांची वाढून २३८५० वर पोहोचला होता. दरम्यान, कर्जमुक्त झालेल्या रिलायन्स पॉवर कंपनीबाबत अजून एक फायद्याची अपडेट आली आहे.
रिलायन्स पॉवर कंपनी शेअरची सध्याची स्थिती
गुरुवार, 02 जानेवारी 2025 रोजी रिलायन्स पॉवर लिमिटेड कंपनी शेअर 3.49 टक्क्यांनी वाढून 46.29 रुपयांवर पोहोचला होता. रिलायन्स पॉवर लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 53.64 रुपये होता, तर रिलायन्स पॉवर लिमिटेड शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 19.40 रुपये होता. रिलायन्स पॉवर कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 18,398 कोटी रुपये आहे.
रिलायन्स पॉवर कंपनीने अपडेट दिली
रिलायन्स पॉवर लिमिटेड कंपनीचे युनिट सासन पॉवर लिमिटेडने ब्रिटनच्या आयआयएफसीएल कंपनीचे १५ कोटी डॉलरचे कर्ज फेडले आहे. रिलायन्स पॉवर लिमिटेड कंपनीने 31 डिसेंबर 2024 चे कर्ज फेडीचे आश्वासन पूर्ण केले आहे. रिलायन्स पॉवर कंपनीने १ जानेवारी रोजी स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, ‘या कर्जाच्या परतफेडीमुळे सासन पॉवर कंपनीची क्षमता अधिक बळकट होईल. मध्य प्रदेशातील सासन येथे सासन पॉवरचा ३,९६० मेगावॅट क्षमतेचा अत्याधुनिक वीज प्रकल्प असून तो जगातील सर्वात मोठा युनिफाईड कोळशावर चालणारा वीज प्रकल्प आहे.
रिलायन्स पॉवर शेअरने किती परतावा दिला
मागील ५ दिवसात रिलायन्स पॉवर कंपनी शेअरने 3.91% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात या शेअरने 19.09% परतावा आहे. मागील ६ महिन्यात रिलायन्स पॉवर कंपनी शेअरने 61.23% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 92.07% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 16.73% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात रिलायन्स पॉवर शेअरने गुंतवणूकदारांना 1,241.74% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Reliance Power Share Price Thursday 02 January 2025 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं