Reliance Share Price | भरवशाच्या रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सबाबत तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, खरेदी वाढली, पुढची टार्गेट प्राईस तपासून घ्या

Reliance Share Price | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे सप्टेंबर 2023 तिमाहीचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. या तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने 27 टक्के वाढीसह 17,394 कोटी रुपये निव्वळ नफा कमवला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या तेल आणि वायू व्यवसायात मजबूत वाढ झाल्याने त्यांचा महसूल वाढला आहे.
फॅशन-लाइफस्टाइल सेगमेंट, किराणा आणि ई-कॉमर्स व्यवसायात देखील लक्षणीय वाढ पाहायला मिळाली आहे. आज सोमवार दिनांक 30 ऑक्टोबर 2023 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.77 टक्के वाढीसह 2,306 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
सेबीला दिलेल्या माहितीत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने कळवले आहे की, जुलै-सप्टेंबर 2023 तिमाहीत कंपनीचा नफा वार्षिक आधारावर 27.3 टक्क्यांच्या वाढीसह 17,394 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने 13,656 कोटी रुपये नफा कमावला होता. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे ऑपरेटिंग उत्पन्न 2.34 लाख कोटी रुपये नोंदवले गेले आहे.
शेअर बाजार तज्ञांच्या मते, रिलायन्स कंपनीने सर्व व्यवसाय क्षेत्रात जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये खरेदी वाढू शकते. तज्ञांच्या मते पुढील काळात रिलायन्स कंपनीचे शेअर्स 2300 ते 2350 रुपये किंमत पातळी स्पर्श करू शकतात. ज्या गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमध्ये रिलायन्स कंपनीचे शेअर्स असतील, त्यांना तज्ञांनी स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे.
शेअर बाजारातील तज्ञांनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअरवर 2210 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावून 2350 रुपये लक्ष्य किंमतीसाठी होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. 2350 रुपये लक्ष किंमत स्पर्श केल्यावर हा स्टॉक 2,500 रुपये किंमत स्पर्श करेल, असे तज्ञ म्हणाले.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Reliance Share Price NSE 30 October 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं