Reliance Share Price | झटपट कमाईची होणार! रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, संधी सोडू नका

Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये जून तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळाली होती. आज देखील या कंपनीचे शेअर्स किंचित घसरले आहेत. यापूर्वी कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या पात्र शेअरधारकांना प्रति इक्विटी शेअर 10 रुपये अंतिम लाभांश देण्याची शिफारस केली होती. ( रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश )
लाभांश वाटप करण्याची रेकॉर्ड तारीख म्हणून कंपनीने 19 ऑगस्ट 2024 हा दिवस निश्चित केला आहे. आज सोमवार दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 0.56 टक्के घसरणीसह 2,932 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचा लाभांश वाटप करण्याचा रेकॉर्ड चांगला आहे. 2023 मध्ये या कंपनीने गुंतवणुकदारांना 9 रुपये लाभांश वाटप केला होता. 2022 मध्ये या कंपनीने 8 रुपये प्रति इक्विटी शेअर अंतिम लाभांश वाटप केला होता. जून तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने 2,35,767 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील तिमाहीतील 2,41,067 कोटी रुपये महसुलाच्या तुलनेत कंपनीचे उत्पन्न 2.20 टक्क्यांनी घसरले आहे. दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचा PAT 17,448 कोटी रुपये नोंदवला गेला होता.
मागील आठवड्यात शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 1.82 टक्के वाढीसह 2948.30 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. शुक्रवारी या शेअरने 2954.05 रुपये ही इंट्राडे उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. तर 2912.05 रुपये ही इंट्राडे नीचांकी पातळी स्पर्श केली होती. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत तब्बल 1.67 टक्के वाढली आहे.
मागील एका महिन्यात रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 7.29 टक्क्यांनी घसरला होता. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 13.84 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील दोन वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने लोकांना 24.44 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील तीन वर्षांत हा स्टॉक 53.77 टक्क्यांनी मजबूत झाला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Reliance Share Price NSE Live 12 August 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं