Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार?

Rhetan TMT Share Price | रेहतन टीएमटी कंपनीचे शेअर्स शुक्रवारी जबरदस्त तेजीत वाढत होते. तर आज देखील हा स्टॉक मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे. या कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारी 17.55 टक्के वाढीसह 10.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. शुक्रवारी ट्रेडिंग दरम्यान हा स्टॉक 11.07 रुपये या दैनिक उच्चांक किमतीवर पोहचला होता. ( रेहतन टीएमटी कंपनी अंश )
मे 2023 मध्ये या कंपनीचे शेअर्स 13.25 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 6 मे 2024 रोजी रेहतन टीएमटी स्टॉक 11.43 टक्के वाढीसह 12.09 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.
मार्च 2024 पर्यंत रेहतन टीएमटी कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 62.12 टक्के भाग भांडवल धारण केले होते. तर सार्वजनिक गुंतवणुकदारांनी कंपनीचे 37.88 टक्के भाग भांडवल धारण केले होते. रेहतन टीएमटी कंपनीचा IPO दोन वर्षांपूर्वी 2022 मध्ये शेअर बाजारात लॉन्च करण्यात आला होता.
या कंपनीच्या आयपीओ शेअर्सची इश्यू किंमत 70 रुपये होती. सूचीबद्ध झाल्यानंतर या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले होते. या कंपनीने आपल्या शेअरधारकांना 1:1 या प्रमाणात बोनस शेअर्स लाभ आणि स्टॉक स्प्लिट लाभ दिला होता.
रेहतन टीएमटी या कंपनीची स्थापना 1984 साली झाली होती. ही कंपनी गुजरातस्थित लेशा ग्रुपशी संबंधित आहे. ही कंपनी मुख्यतः तेल आणि वायू, पोलाद, इन्फ्रा इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि रासायनिक उत्पादनांच्या व्यवसायात गुंतलेली आहे. शालिन शाह आणि अशोका मेटकास्ट लिमिटेड हे कंपनीचे मुख्य प्रवर्तक आहेत. रेहतन टीएमटी कंपनीचा प्लांट गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यात 15,000 स्क्वेअर यार्ड क्षेत्रफळाच्या जागेवर पसरला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Rhetan TMT Share Price NSE Live 06 May 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं