RIIL Share Price | मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्राचा शेअर तेजीत, 1 दिवसात 13% परतावा, अप्पर सर्किट मालिका

RIIL Share Price | रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 13 टक्के वाढीसह 1136 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 991.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1164.55 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 723 रुपये होती. शुक्रवार दिनांक 13 ऑक्टोबर 2023 रोजी रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 10.66 टक्के वाढीसह 1,097.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानीं यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचा भाग मानली जाते. मागील 7 महिन्यांत रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 50 टक्के नफा कमावून दिला आहे. रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 28 मार्च 2023 रोजी 732.90 रुपये किमतीवर ट्रेड होते. 13 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1136 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
मागील 6 महिन्यात रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 30 टक्के नफा कमावून दिला होता. 17 एप्रिल 2023 रोजी रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 856.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 1136 रुपये किमतीवर पोहचले आहे.
रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही कंपनी मुख्यतः औद्योगिक पायाभूत सुविधा निर्मितीच्या क्षेत्रात व्यवसाय करते. ही कंपनी संगणक सॉफ्टवेअर आणि डेटा प्रोसेसिंगसह, कनेक्टेड सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1665 कोटी रुपये आहे.
जून 2023 तिमाहीत या स्मॉलकॅप कंपनीने 2.82 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. 2023-24 या चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत कंपनीने 14.27 कोटी रुपये महसूल संकलित केले होता. या कंपनीत प्रवर्तकांनी 45.43 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | RIIL Share Price NSE 14 October 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं