Rudra Global Share Price | श्रीमंत करणारा शेअर! अल्पावधीत गुंतवणूकदारांना 300% परतावा दिला, आता फ्री बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट लाभ

Rudra Global Share Price | रुद्र ग्लोबल इन्फ्रा प्रोडक्ट्स कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील 5 दिवसांत रुद्र ग्लोबल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 4 टक्के परतावा कमवून दिला आहे. रुद्र ग्लोबल इन्फ्रा प्रोडक्ट्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 271 कोटी रुपये आहे.
मागील 6 महिन्यांत रुद्र ग्लोबल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 31 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 6 ऑक्टोबर 2023 रोजी रुद्र ग्लोबल इन्फ्रा प्रोडक्ट्स कंपनीचे शेअर्स 2.00 टक्के वाढीसह 112.35 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
23 फेब्रुवारी 2017 रोजी रुद्र ग्लोबल इन्फ्रा प्रोडक्ट्स कंपनीचे शेअर्स 36 रुपये या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या किमतीपासून रुद्रा ग्लोबल इन्फ्रा प्रॉडक्ट्स कंपनीचे शेअर्स 200 टक्के वाढले आहेत. 10 जून 2022 रोजी रुद्रा ग्लोबल कंपनीचे शेअर्स 33 रुपये या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या किमतीपासून या स्टॉकने गुंतवणूकदारांना 220 टक्के परतावा कमावून दिला आहे.
रुद्र ग्लोबल इन्फ्रा कंपनीने सेबीला कळवले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. रुद्रा ग्लोबल इन्फ्रा कंपनी आपल्या शेअर धारकांना 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे.
रुद्र ग्लोबल इन्फ्रा कंपनीच्या संचालक मंडळाने 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स 5 च्या दर्शनी मूल्याच्या दोन शेअर्समध्ये विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. रुद्र ग्लोबल इन्फ्रा कंपनीने अद्याप बोनस शेअर्स किंवा स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड तारीख जाहीर केले नाहीये. रुद्रा ग्लोबल इन्फ्रा प्रॉडक्ट्स या कंपनीची स्थापना 1991 साली झाली झाली होती. रुद्र ग्लोबल इन्फ्रा प्रोडक्ट्स कंपनीची गुजरात राज्यात उत्पादन क्षमता 1000 मेट्रिक टन प्रति महिना आहे.
सध्या ही कंपनी शिप रिसायकलिंग, ऑक्सिजन प्लांट, इंडक्शन फर्नेस आणि री-रोलिंग मिल्स संबंधित व्यवसाय करते. रुद्र ग्लोबल इन्फ्रा कंपनीची वार्षिक स्टील उत्पादन क्षमता 3 लाख मेट्रिक टन आहे. रुद्र ग्लोबल कंपनीच्या शेअरने मागील 2 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 300 टक्के नफा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Rudra Global Share Price today on 06 October 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं