RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL

RVNL Share Price | रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये मागील १ वर्षांत मोठी वाढ (NSE: RVNL) झाली आहे. मंगळवारी RVNL शेअर 1.08% वाढून 451 रुपयांवर पोहोचला होता. रेल्वे कंपनीने मंगळवारी स्टॉक मार्केटला सांगितले की, एससीपीएल लिमिटेड कंपनी सोबतचा त्यांचा संयुक्त उपक्रम पूर्व रेल्वेच्या ८३७.६७ कोटी रुपयांच्या टेंडरसाठी सर्वात कमी बोली लावणारा ठरला आहे. (रेल विकास निगम लिमिटेड कंपनी अंश)
कंपनीला नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाला
रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीने स्टॉक मार्केटला माहिती दिली आहे की, ‘कंपनीला मिळालेल्या या कॉन्ट्रॅक्ट’मध्ये काली डोंगरी ते प्रधानखंडा दरम्यान कटिंग आणि फिलिंग, लहान-मोठे पूल बांधणे, संरक्षक भिंत, लेव्हल क्रॉसिंग, कॅच वॉटर ड्रेन आणि साइड ड्रेन या कामांचा समावेश आहे. रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनी हा कॉन्ट्रॅक्ट ३ वर्षात पूर्ण करायचा आहे.
या संयुक्त उपक्रमात आरव्हीएनएल लिमिटेड कंपनीचा ७४% हिस्सा आहे. तर एससीपीएल कंपनीचा संयुक्त उपक्रमात २६% हिस्सा आहे. रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनी दक्षिण मध्य रेल्वेच्या इंजिनीअरिंग, प्रोक्योरमेंट अँड कन्स्ट्रक्शन टेंडरसाठी सर्वात कमी बोली लावणारी कंपनी ठरली आहे. रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीला मिळालेला हा कॉन्ट्रॅक्ट ६२५.०८ कोटी रुपयांचा आहे.
4 वर्षात कंपनीचे शेअर्स 2400 टक्क्यांहून अधिक वधारले
मागील ६ महिन्यात या शेअरने 63.23% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 191.91% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 1,790.99% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 147.80% परतावा दिला आहे. RVNL कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांकी स्तर 647 रुपये आहे. तसेच 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 154.10 रुपये होता.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | RVNL Share Price 05 November 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं