RVNL Share Price | मूल्यांकनाच्या दृष्टीने RVNL शेअर महाग झाला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL

RVNL Share Price | रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअरने २०२४ मध्ये गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा (NSE: RVNL) दिला आहे. मागील ६ महिन्यात या शेअरने 77% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 196% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 1880% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 157% परतावा दिला आहे. मात्र, मूल्यांकनाच्या दृष्टीने RVNL शेअर महाग झाला आहे असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. (रेल विकास निगम लिमिटेड कंपनी अंश)
शेअरची सध्याची स्थिती
सोमवार 21 ऑक्टोबर रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअर 1.89 टक्के घसरून 468.30 रुपयांवर पोहोचला होता. रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 97,589 कोटी रुपये आहे. मंगळवार 22 ऑक्टोबर रोजी हा शेअर 4.16 टक्के घसरून 446.30 रुपयांवर पोहोचला होता.
शेअर ना ओव्हरबाय, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये
RVNL शेअर टेक्निकल बाबतीत बोलायचे झाल्यास, ‘RVNL शेअरचा ‘RSI’ 42.9 आहे. त्यामुळे RVNL शेअर ओव्हरबाय किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत नाही याचे संकेत आहेत. रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअर्स 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवस आणि 100 दिवसांच्या तुलनेत लोअर (Lower), परंतु 150 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग सरासरीपेक्षा जास्त (Higher) आहेत.
RVNL शेअर डेली चार्ट
स्टॉक मार्केट तज्ज्ञ अभिजीत रामचंद्रन म्हणाले की, “RVNL लिमिटेड कंपनी शेअर डेली चार्टवर किंचित तेजी दिसत आहे. RVNL शेअरला 479 रुपयांवर मजबूत सपोर्ट आहे. डेली चार्टनुसार RVNL शेअरने 520 रुपयांची पातळी गाठल्यास पुढे 578 रुपयांपर्यंत वाढू शकतो.
आनंद राठी ब्रोकरेज फर्म – टार्गेट प्राईस
आनंद राठी ब्रोकरेज फर्मचे स्टॉक मार्केट तज्ज्ञ म्हणाले की, ‘RVNL शेअरला ४८० रुपयांवर मजबूत सपोर्ट आहे आणि ५१५ रुपयांवर प्रतिकार असेल. RVNL शेअर ५१५ रुपये पर्यंत पोहोचल्यास पुढे ५३५ रुपयांपर्यंत वाढू शकतो. आनंद राठी ब्रोकरेज फर्मच्या मते, RVNL शेअरची शॉर्ट टर्मसाठी अपेक्षित ट्रेडिंग रेंज 465 ते 545 रुपयांच्या दरम्यान असेल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | RVNL Share Price 22 October 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं