RVNL Share Price | मागील 3 महिन्यांत दिला 100% परतावा, आता RVNL शेअर BUY करावा की SELL?

RVNL Share Price | आरव्हीएनएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. मागील 3 महिन्यांत या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 100 टक्के परतावा कमावून दिला आहे. नुकताच या कंपनीने एप्रिल-जून 2024 तिमाहीमधील आर्थिक कामगिरीचे आकडे जाहीर केले आहेत. जून तिमाहीत आरव्हीएनएल कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर 34 टक्क्यांनी घसरून 224 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. (आरव्हीएनएल कंपनी अंश )
शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 3.72 टक्के घसरणीसह 518.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचा महसूल देखील 27 टक्क्यांनी घसरून 4,074 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत आरव्हीएनएल कंपनीने 5,571.6 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. त्याचप्रमाणे, आरव्हीएनएल कंपनीचा EBITDA घसरला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत कंपनीचा EBITDA जवळपास निम्मा झाला आहे.
जून तिमाहीत आरव्हीएनएल कंपनीचा EBITDA 48 टक्क्यांनी घसरून 182 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. तर EBITDA मार्जिन 4.5 टक्क्यांवर आला आहे. मागील वर्षी हेच प्रमाण 6.3 टक्क्यांवर होते. मागील 2 वर्षात आरव्हीएनएल स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 17 पट अधिक नफा कमावून दिला आहे. जर तुम्ही दोन वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 17 लाखांपेक्षा जास्त झाले असते.
मागील आठवड्यात गुरुवारी आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या घसरणीसह 538.35 रुपये किमतीवर आले होते. मागील एका आठवड्यात आरव्हीएनएल शेअरमध्ये जवळपास 10 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली होती. 2024 या वर्षात आतापर्यंत आरव्हीएनएल स्टॉक तब्बल 195 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. मागील एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 330 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | RVNL Share Price NSE Live 10 August 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं