Seacoast Shipping Share Price | 4 रुपयाचा शेअर सुसाट तेजीत! दररोज अप्पर सर्किट हीट करतोय, खरेदी करावा का?

Seacoast Shipping Share Price | सीकोस्ट शिपिंग सर्व्हिसेस कंपनीच्या शेअर्समध्ये अल्पकालीन घसरणीनंतर आता तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सीकोस्ट शिपिंग सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 3.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
आज देखील सीकोस्ट शिपिंग सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 211 कोटी रुपये आहे. आज शुक्रवार दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी सीकोस्ट शिपिंग सर्व्हिसेस स्टॉक 10.00 टक्के वाढीसह 4.29 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
सीकोस्ट शिपिंग सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीने एमव्ही भारद्वाज नावाचे जहाज ताब्यात घेतल्याची माहिती सेबीला कळवली, आणि कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू झाली. सीकोस्ट शिपिंग सर्व्हिसेस कंपनीने आपली ऑपरेशनल क्षमता वाढविण्यासाठी ही एक धोरणात्मक गुंतवणूक केली आहे. हे जहाज सध्या कतार बंदरावर उभे ठेवण्यात आले आहे. जहाजाची तपासणी आणि इतर प्रक्रिया 15 जानेवारी 2024 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या जहाजाला ताब्यात घेण्यासाठी सीकोस्ट शिपिंग सर्व्हिसेस कंपनीला 6 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात 51 कोटी रुपये द्यावे लागले आहेत. दरम्यान जहाज खरेदी खर्चाचा विचार करून कंपनीने आपली प्रस्तावित बायबॅक योजना पुढे ढकलली आहे.
सीकोस्ट शिपिंग लिमिटेड ही कंपनी मुख्यतः आयात आणि निर्यात व्यवसाय करणाऱ्या लोकांना लॉजिस्टिक सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी ड्राय बल्क लॉजिस्टिक्स, कंटेनर फ्रेट फॉरवर्डिंग लॉजिस्टिक्सवर अधिक भर देते. सीकोस्ट शिपिंग सर्व्हिसेस ही कंपनी भारताच्या मुद्रा बंदरातून कंटेनरमध्ये कृषी मालाची निर्यात करणाऱ्या टॉप 3 फ्रेट फॉरवर्डर्सपैकी हे एक म्हणून प्रसिद्ध आहे.
सीकोस्ट शिपिंग लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 4.31 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 1.84 रुपये होती. 2023 या वर्षात सीकोस्ट शिपिंग सर्व्हिसेस कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 20 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. सीकोस्ट शिपिंग सर्व्हिसेस कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 27.85 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. तर 72.15 टक्के भाग भांडवल सार्वजनिक गुंतवणूकदारांनी धारण केले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Seacoast Shipping Share Price NSE Live 05 January 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं