SEL Manufacturing Share Price | 'एसईएल मॅन्युफॅक्चरिंग' कंपनीचे शेअर्स घसरले, गुंतवणुकदारांना करोडपती बनवणाऱ्या शेअर किती स्वस्त झालाय?

SEL Manufacturing Share Price | ‘एसईएल मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेड’ या वस्त्रोद्योग क्षेत्रात व्यापार करणाऱ्या कंपनीचे शेअर गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2 टक्के घसरणीसह 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर आले आहेत. मागील एका वर्षभरापासून या कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे.
मागील एका वर्षाच्या कालावधीत, ज्या लोकांनी या स्टॉकवर पैसे लावले होते, त्यांना आता 90 टक्क्यांहून अधिक नुकसान सहन करावा लागत आहे. आज शुक्रवार दिनांक 19 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.99 टक्के घसरणीसह 130.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
शेअरमध्ये अफाट घसरण :
28 एप्रिल 2022 रोजी ‘एसईएल मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 1976 रुपये या आपल्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. तर 18 मे 2022 रोजी ‘SEL मॅन्युफॅक्चरिंग’ कंपनीचे शेअर 1333 रुपये किमतीवर आले होते. यानंतर, सततच्या घसरणीमुळे, आता हा स्टॉक 130 रुपयेवर आला आहे. ‘एसईएल मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेड’ कंपनीचे एकूण बाजार भांडवल 44,102.29 कोटी रुपये आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची घसरण झाली आहे.
कंपनीबद्दल इतर माहिती :
एसईएल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने आपल्या व्यवस्थापन मंडळात मोठे बदल केले आहेत. या कंपनीने ‘अनुकुल भटनागर’ यांना बिगर कार्यकारी संचालक म्हणून नियुक्त केले आहे. ‘एसईएल मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेड’ कंपनीने अद्याप आपले मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकालही जाहीर केले नाहीत. डिसेंबर 2022 च्या तिमाही कंपनीने 142.57 कोटी रुपये सेल्स केला होता.
डिसेंबर 2022 तिमाहीत ‘एसईएल मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेड’ कंपनीला 45.20 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलने कंपनीच्या निव्वळ तोट्यात 60.02 टक्के वाढ झाली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | SEL Manufacturing Share Price today on 19 May 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं