Senco Gold Share Price | सोनं नव्हे! सोन्याचे दागिने बनवणाऱ्या 'या' कंपनीचे शेअर्स खरेदी करा, पैसा तुफान गतीने वाढेल

Senco Gold Share Price | नुकताच केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. त्यात सोन्या-चांदीबाबत मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. भारत सरकारने सोने, चांदी आणि प्लॅटिनमवरील आयात शुल्कात 9 टक्के कपात करण्याची घोषणा केली आहे. सोने आणि चांदीवरील एकूण आयात शुल्क 15 टक्केवरून कमी करून 6 टक्केवर आणण्यात आले आहे. तसेच सरकारने प्लॅटिनमवरील एकूण आयात शुल्क 15.4 टक्केवरून कमी करून 6.4 टक्केपर्यंत कमी केले आहे.
सोन्या-चांदीवर आयात शुल्क कमी करण्याच्या घोषणेनंतर दागिन्यांचा व्यवसाय करणाऱ्या कंपन्याच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी निर्माण झाली आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टायटन कंपनीचे शेअर्स 6.50 टक्के, सेन्को गोल्ड स्टॉक 10 टक्के, कल्याण ज्वेलर्स कंपनीचे शेअर्स 3.30 टक्के, मोतीसन्स ज्वेलर्स कंपनीचे 12.30 टक्के, राधिका ज्वेलर्स कंपनीचे शेअर्स 11.40 टक्के वाढले होते. यापैकी सेन्को गोल्ड कंपनीच्या शेअर्सने तर एका वर्षात गुंतवणुकदारांचे पैसे 161 टक्के वाढवले आहेत. आज बुधवार दिनांक 24 जुलै 2024 रोजी सेन्को गोल्ड स्टॉक 1.69 टक्के घसरणीसह 973 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, सरकारने सोन्यावरील मूळ कस्टम ड्युटी 10 टक्क्यांवरून कमी करून 5 टक्के केली आहे. तसेच कृषी उपकर 5 टक्क्यांवरून कमी करून 1 टक्के करण्यात आला आहे. एकूणच सोन्यावरील कस्टम ड्युटी 9 टक्क्यांनी कमी झाली आहे. पूर्वी हे दोन्ही प्रमाण मिळून 15 टक्के होते, जे आता 6 टक्केवर आले आहे.
सोन्यावरील शुल्क कमी झाल्यामुळे एक किलो सोने 5 लाख 90 हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्याचप्रमाणे एक किलो चांदीवर 12,700 रुपये शुल्क होते जे आता 7,600 रुपये कमी झाले आहे. प्लॅटिनमवरील शुल्कात देखील 2,000 रुपये कपात करण्यात आली आहे. सार्वभौम सुवर्ण रोख्यांची पूर्तता अंदाजे 1 लाख कोटी रुपये आहे. यामध्ये भारत सरकारला रिडम्प्शनवर 9,000 कोटी रुपये सूट द्यावी लागेल.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Senco Gold Share Price NSE Live 24 July 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं