SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN

SJVN Share Price | व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी शेअर बाजारात चांगली तेजी पाहायला मिळाली. निफ्टी आणि सेन्सेक्स हे दोन्ही निर्देशांक मोठ्या फरकाने उघडले आहेत. शुक्रवारी सकाळी 10.10 वाजता सेन्सेक्स 816 अंकांनी वधारून 77,972 वर, तर निफ्टी 250 अंकांनी वधारून 23,600 च्या पातळीवर व्यवहार करत होता. बाजारातील तेजीदरम्यान शेअर स्पेसिफिक ऍक्शन ही पाहायला मिळत आहे. मागील ५ वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना 336% परतावा दिला आहे.
एसजेव्हीएन लिमिटेडमध्ये मोठी तेजी
आजच्या सुरुवातीच्या व्यवहारात सरकारी वीज क्षेत्रातील कंपनी एसजेव्हीएन लिमिटेडच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. या कंपनीचा शेअर मागील बंद किमतीच्या तुलनेत ६.५ टक्क्यांनी वधारून ११०.२५ रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीने राजस्थान सरकारसोबत सामंजस्य करार केल्यानंतर पीएसयूचे समभाग आले आहेत.
एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीने राजस्थान सरकारच्या ऊर्जा विभागासोबत राज्यात अक्षय ऊर्जेच्या विकासाला गती देण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे, असे एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वीच कंपनीला नवरत्नाचा दर्जा मिळाला
एसजेव्हीएन लिमिटेड राज्यात ५ गिगावॅट क्षमतेचे पंप्ड स्टोरेज प्रकल्प आणि २ गिगावॅट क्षमतेचे फ्लोटिंग सोलर प्रकल्प विकसित करणार आहे. एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीने म्हटले आहे की, दोन्ही बाजूंनी दीर्घकालीन आधारावर अक्षय ऊर्जेच्या विकासासाठी सहकार्य करण्यास सहमती दर्शविली. एसजेव्हीएनसह रेलटेल आणि एनएचपीसी या अन्य कंपन्यांनाही नवरत्नाचा दर्जा देण्यात आल्याने या सरकारी कंपन्यांची एकूण संख्या २५ झाली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | SJVN Share Price 24 November 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं