SJVN Share Price | अल्पावधीत 75 टक्के परतावा दिला, सरकारी कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करणार? परतावा पाहून घ्या

SJVN Share Price | SJVN लिमिटेड या सरकारी मालकीच्या ‘मिनीरत्न कंपनी’ वीज उत्पादक कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. या कंपनीने नुकताच आपले एप्रिल-जून 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. जून तिमाहीत SJVN लिमिटेड कंपनीच्या नफ्यात आणि महसूल उत्पन्नात किंचित घसरण पहायला मिळाली आहे.
ब्रोकरेज फर्म अँटिक स्टॉक ब्रोकिंगच्या तज्ञांनी SJVN लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मागील 6 महिन्यांत SJVN लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 73 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोजी SJVN लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3.77 टक्के वाढीसह 57.75 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
Antique Stock Broking फर्मच्या तज्ञांनी देखील SJVN लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर प्रति शेअर 65 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. 10 ऑगस्ट 2023 रोजी SJVN लिमिटेड कंपनीचे शेअर्स 54.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. SJVN कंपनीकडे 2 GW क्षमतेचे ऑपरेशनल प्रकल्प आहे. यासह कंपनीकडे 55 GW क्षमतेचा डेव्हलपमेंट पोर्टफोलिओ देखील आहे. SJVN लिमिटेड कंपनीने आर्थिक वर्ष 2027 पर्यंत 12.5 GW क्षमतेचे आणि आर्थिक वर्ष 2030 पर्यंत 25 GW क्षमतेचे लक्ष्य साध्य करण्याचे निश्चित केले आहे. या व्यतिरिक्त, ही कंपनी पंप स्टोरेज प्रकल्पांमध्ये देखील व्यवसाय संधी शोधत आहे.
SJVN लिमिटेड या ‘मिनीरत्न’ दर्जा असलेल्या PSU कंपनीने आपले एप्रिल-जून 2023 या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले. 2023-24 या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या जून तिमाहीत कंपनीने 55 टक्के घसरणीसह 271.75 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या जून तिमाही कालावधीत SJVN लिमिटेड कंपनीने 609.23 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. ज्या दिवशी कंपनीने आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर केले होते, त्याच दिवशी एसजेव्हीएन कंपनीच्या स्टॉकमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. मात्र नंतर स्टॉक मध्ये प्रॉफिट बुकींग सुरू झाली आणि शेअर 1.79 टक्के घसरणीसह 54.90 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
SJVN कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, कंपनीने जून 2023 तिमाहीत 744.39 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. जो मागील आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत 1,072.23 कोटी रुपये होता. जून 2023 तिमाहीत SJVN लिमिटेड कंपनीचा एकूण खर्च 358.16 कोटी रुपये नोंदवला गेला होता. तर मागील वर्षी जून तिमाहीत कंपनीचा एकूण खर्च 420.44 कोटी रुपये नोंदवला गेला होता. SJVN लिमिटेड कंपनीचे डेट इक्विटी रेशो मागील वर्षीच्या जून 2023 तिमाहीत 0.54 टक्के नोंदवले गेले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | SJVN Share price today on 14 August 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं