Sonata Software Share Price | मल्टिबॅगर परतावा, फ्री बोनस शेअर्स आणि 700 टक्के डिव्हीडंड, श्रीमंत करतोय सोनाटा सॉफ्टवेअर शेअर

Sonata Software Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त गोंधळ पाहायला मिळत आहे. इस्राईल आणि हमास युद्धाचा नकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारावर पाहायला मिळत आहे. आणि जागतिक मंदीचे सावट आणखी गडद झाले आहे. अशा मंदीच्या काळात देखील सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत.
आयटी क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्क्यांच्या वाढीसह 1101.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या आयटी कंपनीचे शेअर्स 1042.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज शुक्रवार दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी सोनाटा सॉफ्टवेअर स्टॉक 0.98 टक्के वाढीसह 1,146.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीचे शेअर्स वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीची उत्कृष्ट तिमाही कामगिरी आणि बोनस शेअर्स व लाभांश वाटपाची घोषणा हे आहे. सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीने आपल्या शेअर धारकांना एका शेअरवर 1 बोनस शेअर देण्याची घोषणा केली होती.
नुकतीच सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीने आपल्या पात्र शेअरधारकांना 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीने अद्याप बोनस शेअर्स वाटपाची रेकॉर्ड डेट जाहीर केलेली नाही. सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीने यापूर्वी सप्टेंबर 2022 मध्ये देखील शेअर धाएकाना 1 : 3 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप केले होते.
सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीने आपल्या शेअरधारकांना 700 टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. या लाभांश वाटपाची पात्रता निश्चित करण्यासाठी कंपनीने 7 नोव्हेंबर 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीच्या संचालक मंडळाने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी आपल्या शेअर धारकांना दर्शनी मूल्यावर 700 टक्के अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे.
2023-24 या चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीने 124.2 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. त्याच वेळी सप्टेंबर 2023 तिमाहीत कंपनीने 1912.6 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1156 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 510 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Sonata Software Share Price NSE 27 October 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं