Stock To Buy | या शेअरने गुंतवणूकदारांना 1,22,619 टक्के परतावा दिला, करोडपती बनवणाऱ्या स्टॉकचे तपशील वाचा

Stock To Buy | शेअर बाजारात अनेक कंपन्यांचे शेअर्स आहेत जे आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घ काळात तसेच अल्पावधीत अप्रतिम नफा कमावून देतात. आज या लेखात आपण अशाच एका स्टॉक बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. या कंपनीचे नाव आहे, ‘SRF लिमिटेड’. स्पेशालिटी केमिकलशी संबंधित ‘SRF लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने मागील 24 वर्षात आपला गुंतवणूकदारांना 1,22,619 टक्के इतका भरघोस परतावा कमावून दिला आहे.
शेअरची वाटचाल :
‘एसआरएफ लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स शुक्रवारी दिनांक 19 मे 2023 रोजी 0.25 टक्के वाढीसह 2,434.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 24 वर्षांपूर्वी म्हणजेच जानेवारी 1999 मध्ये ‘एसआरएफ लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 2 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अशा प्रकारे या शेअरने आपल्या दीर्घ कालीन गुंतवणूकदारांना 1,22,619 टक्के नफा कमावून दिला आहे. ‘एसआरएफ लिमिटेड’ कंपनीच्या स्टॉकची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 2002 रुपये होती. 14 सप्टेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 2,864.35 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. ‘एसआरएफ लिमिटेड’ कंपनीचे एकूण बाजार भांडवल 75,029.57 कोटी रुपये आहे.
गुंतवणुकीवर परतावा :
जर तुम्ही 1999 मध्ये SRF लिमिटेड कंपनीच्या शेअर्सवर 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 12 कोटी रुपये झाले असते. ज्या लोकांनी 24 वर्ष या कंपनीचे शेअर्स होल्ड केले होते, ते लोक आता करोडपती झाले आहेत. म्हणून शेअर बजार तज्ञ नेहमी स्टॉक दीर्घ काळ होल्ड करण्याचा सल्ला देतात.
शेअरची लक्ष्य किंमत :
डोमेस्टिक ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या तज्ञांनी SRF लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने या स्टॉकवर 2680 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. मार्च तिमाहीत ‘एसआरएफ लिमिटेड’ कंपनीने 3,142.42 कोटी रुपये महसूल संकलित केला होता, आणि 580.70 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | SRF Limited Stock To Buy recommended by experts check details on 21 May 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं