Sri Adhikari Brothers Share Price | श्रीमंत करतोय हा शेअर! 1 वर्षात 50,000 रुपयांवर दिला 1.18 कोटी परतावा

Sri Adhikari Brothers Share Price | श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना अक्षरशः करोडपती बनवले आहे. एकेकाळी ही कंपनी ‘सब टीव्ही’ या नावाने चॅनल चालवत होती. आता ही कंपनी मस्ती, दबंग, धमाल गुजरात, दिल्लगी आणि मायबोली यासारखे चॅनेल चालवते. ( श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क कंपनी अंश )
7 ऑगस्ट 2024 रोजी श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क कंपनीचे शेअर्स 418.35 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. एक वर्षापूर्वी या कंपनीचे शेअर्स 1.76 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 23670 टक्के परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क स्टॉक 1.99 टक्के वाढीसह 430.10 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
जर तुम्ही एका वर्षभरापूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 50,000 रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1,18,85,000 रुपये झाले असते. जर तुम्ही एका वर्षापूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 10,000 रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 23.77 लाख रुपये झाले असते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1000 कोटी रुपये आहे. जून 2024 अखेरपर्यंत प्रवर्तकांकडे कंपनीचे 59.52 टक्के भागभांडवल होते. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांकडे या कंपनीचे 40.48 टक्के भागभांडवल होते.
जानेवारी-मार्च 2024 या तिमाहीत श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क कंपनीचा स्टँडअलोन महसूल 1.5 कोटी रुपये नोंदवला गेला होता. या कालावधीत कंपनीचे एकूण उत्पन्न 1.78 कोटी रुपये नोंदवले गेले होते. मार्च तिमाहीत या कंपनीचा एकूण खर्च 7.39 कोटी रुपये होता. याच तिमाहीत कंपनीला 5.60 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क कंपनीची सुरुवात 1985 मध्ये झाली होती. ही कंपनी भारतातील पहिली सूचीबद्ध टेलिव्हिजन कंपनी मानली जाते. ही कंपनी बीएसई इंडेक्सवर 1995 मध्ये सूचीबद्ध झाली होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Sri Adhikari Brothers Share Price NSE Live 10 August 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं