Jhunjhunwala Portfolio | झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओमध्ये सामील हा स्टॉक 44% परतावा देऊ शकतो, स्टॉक स्वस्तात खरेदीची संधी

Jhunjhunwala Portfolio | शेअर बाजार मागील दोन आठवड्यात आपल्या विक्रमी उच्चांक पातळीजवळ पोहचला आहे. मागील काही महिन्यांत स्टॉक मार्केटमध्ये जी रिकव्हरी पाहायला मिळाली आहे, त्यात अनेक कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची वाट पाहायला मिळाली आहे. या दरम्यान अनेक दिग्गज कंपनीच्या शेअर्सची किंमत वधारली आहे. जर तुम्ही गुंतवणुकीसाठी मजबूत स्टॉक शोधत असाल तर आम्ही या लेखात तुम्हाला एक स्टॉक सुचवणार आहोत. राकेश झुनझुनवाला यांच्या आवडत्या स्टार हेल्थ आणि अलाईड इन्शुरन्स कंपनीच्या स्टॉकवर लक्ष ठेवा. ब्रोकरेज हाऊसने अंदाज व्यक्त केला आहे की, या कंपनीचे शेअर्स जबरदस्त वाढू शकतात. हा स्टॉक आपल्या IPO इश्यू किंमतीच्या तुलनेत खूप स्वस्तात उपलब्ध झाला आहे.
स्टार हेल्थ कंपनीच्या स्टॉकमध्ये तेजी :
ब्रोकरेज हाऊस एमके ग्लोबलने स्टार हेल्थ कंपनीच्या शेअर्स साठी 860 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. तज्ञांनी या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. आत जर तुम्ही 600 रुपये किंमतीनुसार स्टॉकमध्ये पैसे लावले तर तुम्हाला अल्पावधीत 44 टक्के परतावा मिळेल. आर्थिक वर्ष 2023 साठी कंपनीच्या व्यवस्थापनाने 63-65 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. ठेवले आहे. कंपनीचा अंदाजित CoR 93.-95 टक्के ठेवण्यात आला आहे. या कंपनीची आर्थिक वर्ष FY22-23 मधील कामगिरी खूप निराशाजनक होती. परंतु शेअरची किमत, पॉलिसी दावामधील घसरणीमुळे आता स्टॉक तेजीत आला आहे. कंपनीच्या व्यवस्थापनाला आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 20-22 टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे. कंपनीचा फोकस सध्या रिटेल आणि एसएमई अधिक आहे. ब्रोकरेज हाऊस आयसीआयसीआय डायरेक्टने या स्टॉकवर 850 रुपयांची लक्ष्य किंमत जाहीर केली असून स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
शेअर 36 टक्के स्वस्तात उपलब्ध :
दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये सामील असलेला स्टार हेल्थ आणि अलाईड इन्शुरन्स कंपनीच्या स्टॉकचा वाटा 17.4 टक्के आहे. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये या कंपनीचे एकूण 100,753,935 शेअर्स होल्ड आहेत, ज्यांचे सध्याचे बाजार मूल्य 6,321.8 कोटी रुपये आहे. राकेश झुनझुनवाला यांच्या मृत्यूनंतर त्यांचा पोर्टफोलिओ सध्या त्याची पत्नी रेखा झुनझुनवाला सांभाळत आहे. त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये कंपनीचे एकूण 17,870,977 शेअर्स होल्ड आहेत, ज्याचे प्रमाण एकूण पोर्टफोलिओच्या 3.1 टक्के आहे. या वर्षी आतापर्यंत या स्टॉकमध्ये 20 टक्के पडझड पाहायला मिळाली आहे. त्याच वेळी स्टॉक आपल्या 940 रुपये या उच्चांक किंमत पातळीवरून 36 टक्के खाली ट्रेड करत आहे. 900 रुपयांच्या या IPO इश्यू किमतीच्या तुलनेत स्टॉक आता 30 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. या कंपनीचा IPO 10 डिसेंबर 2021 रोजी शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Star Health and Allied Insurance Shares included in Jhunjhunwala Portfolio has increased on 25 November 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं