Stock in Focus | बाब्बो! 75 टक्क्यांपेक्षा अधिक पडला आहे हा शेअर, खरेदी करावा का स्वस्तात?

Stock In Focus | कोरोना महामारीच्या काळात स्टॉक मार्केट कोसळला होता, पण जेव्हा त्यात सुधारणा झाली, तेव्हा अनेक कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवले होत. मात्र असा एक स्टॉक आहे ज्याने कोरोना काळात तर लोकांना मालामाल केले, पण आता त्याच स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना कंगाल ही बनवले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान शेअर बाजारात सूचिबद्ध झालेली हेल्थकेअर आणि वेलनेस कंपनी न्यूरेका लिमिटेडचे शेअर्स 2175 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मात्र आता हा स्टॉक पडला असून 511.80 रुपयांवर ट्रेड करत आहे. सध्या हा स्टॉक 510 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहे.
शेअर्सची लिस्टिंग किंमत :
Neureka लिमिटेड कंपनीच्या IPO चा आकार 100 कोटी रुपये होता, आणि तो 39.93 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. 25 फेब्रुवारी 2021 रोजी या कंपनीचे शेअर्स 634.95 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. सध्या स्टॉक लिस्टिंग किंमतीपेक्षाही खाली आले आहे. जर आपण या कंपनीच्या शेअरचे चार्ट पॅटर्न पाहिले तर आपल्याला समजेल की या वर्षी आतापर्यंत Neureka कंपनीचे शेअर्स 75 टक्क्यांपेक्षा अधिक पडले आहेत.
1 लाखाचे झाले 49000 :
सहा महिन्यांपूर्वी ज्या लोकांनी या कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावले होते, त्यांचे गुंतवणूक मूल्य आता निम्म्याहून कमी झाले आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या स्टॉकमध्ये 34 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली आहे. मागील 5 दिवसांत हा स्टॉक 16 टक्क्यांनी पडला आहे.
कोरोनाच्या काळातील परिस्तिथी :
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ऑक्सिमीटर, थर्मामीटर, बीपी मॉनिटर, नेब्युलायझर यांसारख्या वस्तूंची मागणी अनेक पटींनी वाढली होती. या कंपनीचे शेअर्स स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध झाल्यानंतर काही महिन्यांच्या काळातच दुप्पट झाले होते. वास्तविक न्यूरेका ही कंपनी पाच श्रेणींमध्ये उत्पादने पुरवते. क्रॉनिक डिव्हाइस, ऑर्थोपेडिक, मदर आणि चाइल्ड, पोषण आणि जीवनशैली विभाग हे कंपनीचे मुख्य उत्पादन श्रेणी आहेत. या कंपनीच्या उत्पादनात डॉ ट्रस्ट आणि डॉ फिजिओ सारखे ब्रँड देखील सामील आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Stock In Focus of Neureka Limited Share price has fallen down made huge loss of shareholders on 1 December 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं