Stocks in Focus | मार्ग श्रीमंतीचा! फक्त 3 दिवसात दिला 37 टक्के परतावा, हा 53 रुपयाचा शेअर खरेदी करावा?

Stocks in Focus | वन पॉइंट वन सोल्यूशन्स कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये वन पॉइंट वन सोल्यूशन्स या एमएसई एसएमई कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 47.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे.
मागील दोन आठवड्यांत वन पॉइंट वन सोल्यूशन्स कंपनीच्या शेअरची किंमत 32 रुपयेवरून वाढून 50 रुपयेच्या पार गेली आहे. मागील 15 दिवसांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 50 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मंगळवार दिनांक 21 नोव्हेंबर 2023 रोजी वन पॉइंट वन सोल्यूशन्स कंपनीचे शेअर्स 12.84 टक्के वाढीसह 53.60 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. आजही हा शेअर 4.58 टक्के वाढून 56 रुपयांवर ट्रेड करत आहे.
वन पॉइंट वन सोल्यूशन्स कंपनी आपली संपूर्ण मालकीची उपकंपनी वन पॉइंट वन सिंगापूरचे अधिग्रहण करण्याची तयारी करत आहे. या अधिगग्रहणानंतर वन पॉइंट वन सोल्यूशन्स कंपनीकडे One Point One Singapore ya कंपनीचे 100 टक्के भाग भांडवल येतील.
परकीय बाजारपेठेत मूळ कंपनीची उत्पादने आणि सेवांच्या विकासासाठी वन पॉइंट वन सोल्युशन्स कंपनीने हे अधिग्रहण करण्याचा निर्णय घेतला आहे. YTD आधारेवन पॉइंट वन सोल्यूशन्स कंपनीच्या शेअरची किंमत 16 रुपयेवरून वाढून 50 रुपयेच्या पार गेली आहे. या काळात गुंतवणूकदारांनी तब्बल 200 टक्के परतावा कमावला आहे.
वन पॉइंट वन सोल्युशन्स लिमिटेड कंपनीने सेबीला दिलेल्या माहिती कळवले आहे की, त्यांच्या सिंगापूर स्थित उपकंपनीच्या अधिग्राहणाला सिंगापूर सरकारच्या लेखा आणि कॉर्पोरेट नियामक प्राधिकरण विभागाने मंजुरी दिली आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 35 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 115 टक्के वाढली आहे. मागील 5 वर्षांत वन पॉइंट वन सोल्यूशन्स कंपनीच्या शेअरची किंमत 500 टक्के वाढली आहे. वन पॉइंट वन सोल्यूशन्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 928 कोटी रुपये होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 47.50 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 1425 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Stocks in Focus for investment 21 November 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं