Stocks To Buy | तीन अप्रतिम बँकिंग शेअर्स खरेदी करण्याचा तज्ञांचा सल्ला, लिस्ट मधील स्टॉकचा तपशील पहा

Stocks To Buy | मागील एका आठवड्यात करूर व्यासा बँक, कॅनरा बँक आणि इंडियन बँकेच्या शेअर्समध्ये 12 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. करूर व्यासा बँकचा शेअर 82.15 रुपयांवर ट्रेड करत होता, आणि त्यात 12.42 टक्क्यांची वाढ होऊन स्टॉक 92.75 रुपये किमतीवर गेला आहे. कॅनरा बँकचा शेअर देखील 12.37 टक्क्यांनी वाढून 221 रुपये वरून 250.25 रुपयांवर गेला आहे. इंडियन बँकचा शेअर 190 रुपयांवरून 215.55 रुपयांवर पोहोचला आहे.
करूर व्यासा बँक :
जर तुम्ही करूर व्यासा बँकेचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, या शेअरने मागील एका महिन्यात 2.49 टक्के परतावा मिळवून दिला आहे. परंतु मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम नफा देऊन मालामाल केले आहे. या बँकिंग स्टॉकने गेल्या तीन महिन्यांत 96 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली आहे. मागील एका वर्षात या स्टॉकने आपल्या शेअर धारकांना 83.48 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 101.70 आहे, आणि नीचांकी पातळी किंमत 41.75 रुपये होती.
करूर व्यासा स्टॉकवर तज्ञांचे मत काय?
स्टॉक मार्केट तज्ञ अजूनही करूर व्यासा स्टॉक बाबत सकारात्मक आहेत. तज्ञांनी हा स्टॉक मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. एमके ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेसने या स्टॉकवर 95 रुपयेची लक्ष्य किंमत निर्धारित केली आहे.
कॅनरा बँक
कॅनरा बँकेने मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांचे 17.96 टक्के नुकसान केले आहे. मात्र, गुंतवणूकदारांनी या स्टॉकमधून गेल्या 3 वर्षांत 32 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवला आहे. मागील एका वर्षात कॅनरा बँकेच्या स्टॉकने आपल्या शेअर धारकांना 25 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. स्टॉकची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 171.75 रुपये होती, तर स्टॉकची उच्चांक पातळी किंमत 272.80 रुपये आहे.
कॅनरा बँक
कॅनरा बँकेचे शेअर्स खरेदी करावे की विक्री असा संभ्रम तुमच्या मनात निर्माण झाला असेल. काळजी करू नका, शेअर बाजारातील बहुतेक तज्ञांनी हा बँकिंग स्टॉक पोर्टफोलिओ मध्ये जोडण्याचा सल्ला दिला आहे. ज्यां लोकांकडे हा स्टॉक त्यांना तज्ञांनी स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे.
इंडियन बँक :
इंडियन बँकेच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 217.90 रुपये आहे, तर नीचांकी पातळी किंमत 130.90 रुपये होती. मागील एका महिन्यात हा स्टॉक 10 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. तर गेल्या तीन महिन्यांत या स्टॉकने आपल्या शेअर धारकांना 25 टक्के परतावा कमावून दिला आहे.
इंडियन बैंक
इंडियन बँकेच्या शेअर्सबद्दल स्टॉक मार्केट तज्ञ सकारात्मक आहेत. तज्ञांनी हा स्टॉक त्वरित खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या ज्यांच्या कडे स्टॉक आहे त्यांनी स्टॉक होल्ड करावे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Stocks to Buy call has declared by Stock market expert for investment on 20 October 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं