Stocks To Buy | वेगात कमाई होईल! पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन शेअर अल्पावधीत देईल 42 टक्केपर्यंत परतावा

Stocks To Buy | पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीने नुकताच आपले दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीने 23 टक्के वाढीसह 4833 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. तिमाही निकालानंतर ब्रोकरेज फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे.
तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 42 टक्के वाढवण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक परळी किंमत 280 रुपये होती. आज शुक्रवार दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 3.71 टक्के वाढीसह 287.60 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन या सरकारी मालकीच्या कंपनीला महारत्नाचा दर्जा देण्यात आला आहे. नुकताच या कंपनीने आपल्या शेअर धारकांना शेअरच्या दर्शनी मूल्यावर 45 टक्के म्हणजेच जवळपास 4.5 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने डिव्हिडंड वाटप करण्यासाठी रेकॉर्ड डेट म्हणून 27 नोव्हेंबर 2023 हा दिवस निश्चित केला आहे. तर 8 डिसेंबर 2023 पर्यंत गुंतवणुकदारांच्या खात्यात लाभांश जमा केला जाईल.
पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन ही कंपनी शेअर धारकांना उच्च लाभांश देणारी कंपनी आहे. या कंपनीचे लाभांश उत्पन्न प्रमाण 4.8 टक्के आहे. म्हणजेच जर तुम्ही या स्टॉकवर 1000 रुपये लावले तर तुम्हाला एका वर्षात कंपनी 48 रुपये लाभांश म्हणून देईल. सप्टेंबर महिन्यात या कंपनीने आपल्या शेअर धारकांना 1:4 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप केले होते.
जागतिक ब्रोकरेज फर्म CLSA ने पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरवर 360 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 263 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. यावर्षी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरने लोकांना 145 टक्के परतावा कमावून दिला आहे.
FY24 ते FY27 पर्यंत कंपनीचे EPS 4 ते 7 टक्के वाढेल असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. तर FY25-FY26 दरम्यान कंपनीचे ROE प्रमाण 17 टक्के राहण्याची शक्यता आहे. सध्या पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीचा PB प्रमाण 0.5 वर आहे, जो पुढील काही वर्षात 1 पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीने 4833 कोटी रुपये नफा कमावला आहे. तर या तिमाहीत कंपनीचा महसूल 19336 कोटी रुपयेवरून वाढून 22391 कोटी रुपयेवर पोहचला आहे. या तिमाहीत कंपनीने 8629 कोटी रुपये पीबीटी नोंदवला आहे.
मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 6604 कोटी रुपये PBT नोंदवला होता. वार्षिक आधारावर या कंपनीच्या शेअरचा EPS 11.92 रुपयेवरून वाढून 14.65 रुपयेवर पोहोचला आहे. तर कंपनीचा ऑपरेटिंग मार्जिन 38.48 टक्के असून निव्वळ नफा मार्जिन 29.59 टक्के नोंदवला गेला आहे. कंपनीच्या एकूण मालमत्तेवर कर्ज प्रमाण 0.82 पट आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Stocks To Buy for investment 10 November 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं