Stocks To Buy | पैशाने पैसा वाढवा! हे टॉप 3 शेअर्स 32 टक्केपर्यंत परतावा देतील, टार्गेट प्राईस जाणून घ्या

Stocks To Buy | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा काळात ग्लोबल ब्रोकरेज फर्म UBS च्या तज्ञांच्या मते, जीवन विमा सेक्टर सध्या गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहे. पुढील काळात जीवन विमा सेक्टरमध्ये केलेली गुंतवणूक लोकांना भरघोस कमाई करून देऊ शकते. ब्रोकरेज फर्म यूबीएसच्या तज्ञांनी, जीवन विमा क्षेत्रातील कंपन्याच्या शेअर्सबाबत एक अहवाल प्रकाशित केला आहे.
तज्ञांच्या मते, शेअर बाजारातील गुंतवणूकदार जीवन विमा क्षेत्राच्या क्षमतेतील वाढीचा अंदाज कमी लेखत आहेत. तज्ञांच्या मते, आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये विमा प्रीमियममध्ये 14-15 टक्के वाढ आणि VNB मध्ये 14-17 टक्के वाढ अपेक्षित आहे. UBS फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, जीवन विमा कंपन्यांचे मार्जिन आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये वाढण्याची अपेक्षा आहे.
तज्ञांच्या मते, नॉन-पार प्रोडक्ट्सच्या मागणीत वाढ पाहायला मिळू शकते. विमा नियामक संस्था IRDAI समर्पण मूल्याच्या वाजवी शुल्काबाबत बैठक घेणार आहे. अशा परिस्थितीत मॅक्स फायनान्शियल आणि एसबीआय लाइफ कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यास सर्वात योग्य वाटत आहेत. UBS फर्मने या विमा कंपनीचे शेअर्स खरेदी करून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.
मॅक्स फायनान्शिअल सर्व्हिसेस :
या कंपनीच्या शेअर्सला बाय रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी शेअरची टार्गेट प्राइस 1270 रुपये निश्चित केली आहे. शुक्रवार दिनांक 15 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.27 टक्के घसरणीसह 958.00 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
एसबीआय लाइफ इन्शुरन्स :
या कंपनीच्या शेअर्समधील गुंतवणुकीबाबत देखील तज्ञांनी सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. तज्ञांनी या स्टॉकवर 1835 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. शुक्रवार दिनांक 15 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.23 टक्के घसरणीसह 1,502.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
ICICI Prudential :
स्टॉकवर तज्ञांनी न्यूट्रल रेटिंग दिली आहे. यासाठी तज्ञांनी शेअरची टार्गेट प्राइस 640 रुपये निश्चित केली आहे. शुक्रवार दिनांक 15 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.82 टक्के घसरणीसह 568.00 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
HDFC लाइफ :
या स्टॉकवर देखील तज्ञांनी न्युट्रल रेटिंग दिली आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक 715 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. शुक्रवार दिनांक 15 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.53 टक्के वाढीसह 631.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Stocks To Buy for investment 16 March 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं