Stocks To Buy | हे तीन शेअर्स तेजीत, बंपर प्रॉफिट होतोय, हे स्टॉक्स खरेदी करावे का समजून घ्या

Stocks To Buy | भारतीय स्टॉक मार्केटमधे तेजीच्या काळात प्रसिद्ध बँकिंग कंपनीच्या शेअर्स जबरदस्त वाढले आहेत. त्यात बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक आणि इंडियन बँक या तीन सरकारी बँकांच्या शेअर्सनी फक्त 15 दिवसांत आपल्या शेअर धारकांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. बँक ऑफ इंडियाने आपल्या शेअर धारकांना जवळपास 30 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. कॅनरा बँकेनेही आपल्या शेअर धारकांना 28.27 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. आणि इंडियन बँकेही परतावा देण्यात मागे नसून त्यांनी आपल्या शेअर धारकांना या कालावधीत 26 टक्के परतावा कमावून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ या तिन्ही बँकिंग स्टॉकच्या किमतीचा इतिहास
बँक ऑफ इंडिया :
मागील 5 वर्षांत बँक ऑफ इंडियाचा 68 टक्क्यांहून जास्त कमजोर झाला होता. आता हा स्टॉक आपल्या वार्षिक उच्चांक किमतीच्या जवळ ट्रेड करत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक ऑफ इंडियाचे शेअर 2.57 टक्क्यांनी वाढले होते, आणि दिवसा अखेर स्टॉक 61.80 रुपयांवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअर्सनी मागील एका आठवड्यात आपल्या शेअर धारकांना 9.48 टक्के परतावा मिळवून दिला आहे. गेल्या एका महिन्यात या स्टॉकमध्ये 28 टक्क्यांहून जास्त वाढ पाहायला मिळाली आहे. या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 65.80 रुपये आहे, तर नीचांक किंमत पातळी 40.40 रुपये होती. या स्टॉकवर तज्ञ अतिशय सकारात्मक असून त्यांनी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
कॅनरा बँक :
कॅनरा बँकेचे शेअर्स मागील अनेक दिवसांपासून तेजीत ट्रेड करत आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 292 रुपये किमतीवर वाढीसह क्लोज झाला होता. मागील एका आठवड्यात या बँकेच्या शेअरमध्ये फक्त 2.74 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. ज्या लोकांनी महिनाभरापूर्वी या बँकेच्या शेअरमध्ये पैसे लावले होते, त्यांना आता कॅनरा बँकेच्या शेअर्सनी 27.65 टक्के परतावा कमावून दिला आहे. कॅनरा बँकेने मागील 3 महिन्यांत आपल्या शेअर धारकांना सुमारे 30 टक्के परतावा कमवून दिला आहे. आणि मागील वर्षभरात लोकांना 36 टक्के परतावा मिळाला आहे. अॅक्सिस सिक्युरिटीज फर्मने या बँकेच्या खरेदीसाठी 308 रुपयांची लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. तर LKP ने 323 रुपयांच्या लक्ष्य किंमतीसाठी हा स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे.
इंडियन बँक :
इंडियन बँकेचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 249.80 रुपयांवर ट्रेड करत होते. मागील 15 दिवसांत इंडियन बँकेच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 25 टक्क्यांहून जास्त नफा मिळवून दिला आहे. या बँकेच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 258.60 रुपये आहे. आणि 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 130.90 रुपये होती. मागीलएका आठवड्यात हा स्टॉक 7.1 टक्क्यांनी वर गेला आहे. त्याच वेळी, या स्टॉकने गेल्या एका महिन्यात शेअर धारकांना 26.9 टक्के नफा कमवून दिला आहे. मागील तीन महिन्यांत हा स्टॉक 40.69 टक्के आणि एका वर्षात 45.15 टक्के वाढला असून गुंतवणूकदारांनी यातून मजबूत कमाई केली आहे. ज्या लोकांकडे आधीच हा स्टॉक आहे, त्यांनी स्टॉक होल्ड करावा, आणि ज्या लोकांना यातून नफा कमवायचा आहे, त्यांनी स्टॉक बिनधास्त खरेदी करावा.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Stocks to BUY has given tremendous Return to shareholders on 03 November 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं