Suzlon Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, सुझलॉन शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON

Suzlon Share Price | मंगळवारी स्टॉक मार्केटमध्ये पुन्हा तेजी पाहायला मिळाली. मागील तीन-चार सत्रात स्टॉक मार्केट निफ्टीने 24,200 ची पातळी गाठण्यात यश मिळवलं असेल तरी स्टॉक मार्केट अद्याप पूर्णपणे तेजीच्या झोनमध्ये (Gift Nifty Live) आलेला नाही. मंगळवार 3 डिसेंबर 2024 रोजी शेअर बाजाराने जबरदस्त सुरुवात (SGX Nifty) केली आहे. दुसरीकडे, सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचा शेअर आता फोकसमध्ये आला आहे. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)
सुझलॉन शेअरची सध्याची स्थिती
सोमवारी सुद्धा सुझलॉन शेअरने अप्पर सर्किट हिट केला होता. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरमध्ये ५ टक्क्यांची वाढ झाली होती. मंगळवार 03 डिसेंबर 2024 रोजी सुझलॉन शेअर 0.68 टक्के घसरून 65.67 रुपयांवर पोहोचला होता. त्यानंतर सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप वाढून 89,541 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स फर्म – टार्गेट प्राईस
आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स फर्मच्या तज्ज्ञांनी सुझलॉन शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स फर्मने सुझलॉन शेअरसाठी ७३ रुपये टार्गेटप्राईस दिली आहे. रेलिगेअर ब्रोकिंग फर्मच्या तज्ज्ञांनी सुझलॉन शेअरसाठी ७२ ते ७६ रुपये ही शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच शेअरला ५९-६२ रुपये दरम्यान सपोर्ट असल्याचं म्हटलं आहे. तत्पूर्वी, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्मने सुझलॉन एनर्जी शेअरबाबत सकारात्मक तेजीचे संकेत दिले आहेत.
कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल
दुसऱ्या तिमाहीत सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा जवळपास दुप्पट होऊन २०१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. 30 सप्टेंबर 2023 रोजी संपलेल्या तिमाहीत सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीला 102 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा झाला होता. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे एकूण उत्पन्न 2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीत वाढून 2,121.23 कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे मागील वर्षी याच कालावधीत 1,428.69 कोटी रुपये इतके होते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Suzlon Share Price 03 December 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं