Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, कमाई होणार का - NSE: SUZLON

Suzlon Share Price | शुक्रवार 25 ऑक्टोबर रोजी सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर 2.26% टक्के घसरून 67.59 रुपयांवर (NSE: SUZLON) पोहोचला होता. मागील काही वर्षांत सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरने तेजीने परतावा दिला आहे. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरचा भाव ५२ आठवड्यांच्या उच्चांकी ८६ रुपयांवरून जवळपास २२ टक्क्यांनी घसरला आहे. (सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी अंश)
वूड मॅकेन्झी रिपोर्ट
वूड मॅकेन्झीच्या रिपोर्टनुसार, टर्बाइन मॉडेल्सला सर्वाधिक मागणी असलेल्या जगातील टॉप-१० कंपन्यांमध्ये सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे नाव घेतले जाते. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या ‘S144 मॉडेल’ला प्रचंड मागणी आहे. विशेष म्हणजे सुझलॉन ही या यादीतील एकमेव भारतीय कंपनी आहे.
चीनचे वर्चस्व आणि सुझलॉनची कंपनीची एंट्री
पवन ऊर्जा क्षेत्रातील ग्लोबल मार्केटमध्ये चिनी कंपन्यांचे वर्चस्व आहे. 2024 च्या पहिल्या सहामाहीत जागतिक कॉन्ट्रॅक्टपैकी एकूण 82% कॉन्ट्रॅक्ट चिनी कंपन्यांकडे आहेत. ग्लोबल मार्केटमध्ये अशी स्थिती असताना सुद्धा सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीने स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे.
कंपनीकडे सुमारे 5.4 गिगावॅटचे कॉन्ट्रॅक्ट
सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीला मागील महिन्यात एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीकडून आतापर्यंतची सर्वात मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. तसेच या महिन्यात जिंदाल रिन्युएबल्स लिमिटेड कंपनीने S144 मॉडेलसाठी अनेक नवीन कॉन्ट्रॅक्ट दिले आहेत. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीला मिळालेले हे सर्व कॉन्ट्रॅक्ट प्रामुख्याने S144 टर्बाइनसाठी आहेत. कमी वाऱ्यातही उत्कृष्ट कामगिरी देण्यासाठी S144 टर्बाइन डिझाइन करण्यात आले आहेत. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीला सुमारे 5.4 गिगावॅटचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहेत. या कॉन्ट्रॅक्टमध्ये सर्वाधिक कॉन्ट्रॅक्ट S144 मॉडेलसाठी आहेत.
जागतिक बाजारपेठेतील शक्यता
सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या S144 या मॉडेलच्या वाढत्या यशामुळे कंपनीला जागतिक बाजारपेठ मोठी संधी उपलब्ध होऊ शकते असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या S144 या मॉडेलची किंमत ग्लोबल मार्केटमध्ये एक मोठा पर्याय बनवू शकते. कारण ग्लोबल मार्केटमध्ये नवीन तंत्रज्ञान आणि मोठ्या क्षमतेच्या टर्बाइनची मागणी वाढतेय. मात्र, चिनी कंपन्या ग्लोबल मार्केटमध्ये ५ ते ७ मेगावॅट क्षमतेच्या टर्बाइनची विक्री करत असल्याने सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीला आपल्या तंत्रज्ञानात मोठी गुंतवणूक करावी लागणार आहे असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
शेअरने मल्टिबॅगर परतावा दिला
मागील ६ महिन्यात या शेअरने 62.28% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरने 115.25% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 2788.46% परतावा दिला आहे. YTD आधारावर या शेअरने 115.25% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Suzlon Share Price 26 October 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं