Suzlon Share Price | सुझलॉन कंपनी बाबत मोठी अपडेट, शेअर होणार रॉकेट, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: Suzlon

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीने दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केला आहेत. दुसऱ्या तिमाहीत सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचा निव्वळ नफा 96 टक्क्यांनी वाढून तो 200.20 कोटी रुपयांवर (NSE: Suzlon) पोहोचला आहे. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या NSE फाइलिंगनुसार गेल्या वर्षी सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचा निव्वळ नफा 102.29 कोटी होता. (सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी अंश)
कंपनीचा महसूल 48 टक्क्यांनी वाढला
2024-25 च्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचा महसूल 48 टक्क्यांनी वाढून 2,092.99 कोटी झाला, जो गेल्या वर्षी याच कालावधीत 1,417.21 कोटी रुपये होता.
सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीची कमाई विंड टर्बाइन जनरेटर सेगमेंट, सुझलॉन ऑपरेशन आणि मेंटेनन्स सेवा यासारख्या विभागांतून होते. दुसऱ्या तिमाहीत विंड टर्बाइन जनरेटर विभागातील महसूल 72.14 टक्क्यांनी वाढून 1,507.07 कोटी रुपये झाला आहे, जो मागील वर्षीच्या कालावधीत 875.47 कोटी रुपये होता.
शेअरची सध्याची स्थिती
सोमवारी सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर 7 टक्क्यांनी वाढून 72.66 रुपयांवर पोहोचला होता. मंगळवार 29 ऑक्टोबर रोजी हा शेअर 2.78 टक्के घसरून 68.87 रुपयांवर पोहोचला होता. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर एका महिन्यात 12 टक्क्यांनी घसरला आहे.
कंपनी मॅनेजमेंटमध्ये बदल
सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे उपाध्यक्ष गिरीश तांती यांची इंडियन विंड मिल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तसेच नॉर्डेक्सचे भारतातील प्रमुख सरवणन मणिकम यांची संस्थेचे उपाध्यक्ष-सह-सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीने याबाबत स्टॉक मार्केटला माहिती दिली आहे.
IWTMA ची वार्षिक सर्वसाधारण सभा
25 ऑक्टोबरला IWTMA ची वार्षिक सर्वसाधारण सभा चेन्नई येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी, वाइंडर रिन्युएबल एनर्जीचे CEO के भारती यांची खजिनदार म्हणून नियुक्ती करण्यात आली. यासंदर्भांत गिरीश तांती म्हणाले की, जागतिक तापमानवाढ 1.5 अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जगाला 2030 पर्यंत अक्षय ऊर्जा क्षमता तिप्पट करणे आवश्यक आहे.
मल्टिबॅगर परतावा दिला
मागील ६ महिन्यात या शेअरने 64.74% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 117.21% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 2,663.31% परतावा दिल आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 78% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Suzlon Share Price 29 October 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं