Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनी मॅनेजमेंटबद्दल मोठी अपडेट, शेअरवर काय परिणाम होणार? फायदा की नुकसान?

Suzlon Share Price | शेअर बाजारात अनेक कंपन्यांचे शेअर्स सूचीबद्ध आहेत, मते भरघोस परतावा देणारे शेअर्स मोजकेच आहेत. सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स त्यापैकीच एक आहेत. या कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात अप्रतिम कामगिरी केली आहे. आता सुझलॉन एनर्जी कंपनीने सेबीला एक नवीन अपडेट दिली आहे.
कंपनीने माहिती दिली आहे की, साईराम प्रसाद यांना एसजीएसएल कंपनीचे सीईओ म्हणून नियुक्त करण्यात येत आहे. त्यांची नियुक्ती 16 जानेवारी 2024 रोजी पासून लागू होईल. याशिवाय ईश्वरचंद मंगल यांना सीईओ न्यू बिझनेस म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. आज गुरूवार दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 0.23 टक्के वाढीसह 43.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
आता सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सधारकांसाठी आणखी एक खुशखबर आहे. आयआयएफएल अल्टरनेटिव्ह रिसर्च फर्मने आपल्या अहवालात जाहीर केले आहे की, सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स FTSE ऑल वर्ल्ड निर्देशांकात सूचीबद्ध केले जाणार आहेत.
13 फेब्रुवारी 2024 रोजी MSCI जागतिक निर्देशांकातील बदलाबाबत घोषणा केली जाईल. तज्ञांच्या मते, जिंदाल स्टेनलेस, भेल, पीएनबी, एनएमडीसी आणि ओबेरॉय रियल्टी या कंपन्यांचे शेअर्स देखील एमएससीआय निर्देशांकात सामील केले जाणार आहेत.
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीने सेबीला कळवले की, एम डब्ल्यू सीरिज अंतर्गत एवर न्यू एनर्जी कंपनीने सुझलॉन एनर्जी कंपनीला 225 MW क्षमतेचा पॉवर प्लांट स्थापन करण्याची ऑर्डर दिली आहे.
मागील एका महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सची किंमत 13.38 टक्के वाढली आहे. तर मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने लोकांना 142 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी स्टॉकची किंमत 336.50 टक्के वाढली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Suzlon Share Price NSE Live 11 January 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं