Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट, मालामाल करणार शेअर - NSE: SUZLON

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीने 24 जानेवारी 2025 रोजी स्टॉक एक्सचेंजला फायलिंगमध्ये माहिती देताना म्हटले आहे की, ‘सुझलॉन एनर्जी कंपनीला मोठा कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाला आहे. सुझलॉन कंपनीला टोरंट पॉवर लिमिटेड कंपनीकडून ४८६ मेगावॅटसाठी नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. या नवीन कॉन्ट्रॅक्टनंतर सुझलॉन कंपनीची एकूण ऑर्डरबुक १ गिगावॅट झाली आहे.
एफआयआयने शेअर्समध्ये हिस्सेदारी वाढवली
परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी वर्षभरात सुझलॉन एनर्जी कंपनी शेअर्समध्ये हिस्सेदारी मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. डिसेंबर २०२३ च्या तुलनेत डिसेंबर २०२४ मध्ये एफआयआय’ची हिस्सेदारी १७.८३ टक्क्यांवरून २२.८७ टक्क्यांवर पोहोचली आहे.
डीआयआयने शेअर्समध्ये हिस्सेदारी वाढवली
डीआयआय म्हणजे देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी देखील सुझलॉन एनर्जी शेअर्सची खरेदी सुरू केली आहे. सप्टेंबर तिमाहीच्या तुलनेत डिसेंबर तिमाहीत डीआयआयने सुझलॉन कंपनी शेअर्समधील हिस्सेदारी ९.०२ टक्क्यांवरून ९.३१ टक्क्यांपर्यंत वाढवली आहे.
सुझलॉन एनर्जी शेअर परफॉर्मन्स
शुक्रवार, 24 जानेवारी 2025 रोजी सुझलॉन शेअर 2.82 टक्क्यांनी घसरून 52.78 रुपयांवर पोहोचला होता. मागील आठवडाभरात सुझलॉन शेअर 7.13 टक्क्यांनी घसरला आहे. मागील एका महिन्यात हा शेअर 17.97 टक्के घसरला आहे. तसेच YTD आधारवर सुझलॉन एनर्जी शेअर 19.21 टक्क्यांनी घसरला आहे. तर वर्षभरात या शेअरने 24.04 टक्के परतावा दिला आहे.
28 जानेवारी 2025 रोजी मोठी घोषणा होणार
सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीने स्टॉक एक्सचेंजला माहिती देताना सांगितले आहे की, ’28 जानेवारी 2025 रोजी सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी आपले तिमाही निकाल जाहीर करणार आहे. तसेच सुझलॉन ग्रुप आणि टोरंट पॉवर लिमिटेड या दोन कंपन्यांनी एक महत्त्वपूर्ण पार्टनरशिप जाहीर केली आहे. या पार्टनरशिप अंतर्गत एकत्रितपणे एकूण 1 गिगावॅट पवन ऊर्जेची निर्मिती केली जाणार आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Suzlon Share Price Saturday 25 January 2025 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं