Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा

Talbros Auto Share Price | टॅलब्रोस ऑटोमोटिव्ह या ऑटो कॉम्पोनंट संबंधित व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत वाढत आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 293.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 22 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर 347.75 रुपये या आपल्या वार्षिक उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर एप्रिल 2023 महिन्यात टॅलब्रोस ऑटोमोटिव्ह कंपनीचे शेअर्स 86 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. ( टॅलब्रोस ऑटोमोटिव्ह कंपनी अंश )
मागील 12 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 230 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी टॅलब्रोस ऑटोमोटिव्ह स्टॉक 4.99 टक्के वाढीसह 309.30 रुपये किमतीवर करत आहेत.
टॅलब्रोस ऑटोमोटिव्ह कंपनीच्या मरेली टॅल्ब्रोस चेसिस सिस्टम्स या संयुक्त उपक्रमाला एका मोठ्या युरोपियन ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर कंपनीने 1,000 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. या ऑर्डरची पूर्तता मरेली टॅल्ब्रोस चेसिस सिस्टीम्स कंपनीच्या पुणे प्लांटमधून केली जाणार आहे. यासाठी कंपनीने 65 कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ही रक्कम कंपनी अंतर्गत स्रोत आणि कर्जाच्या माध्यमातून जमा करणार आहे. या ऑर्डरची पूर्तता केल्यास टॅलब्रोस ऑटोमोटिव्ह कंपनीला युरोपमध्ये मजबूत स्थान प्राप्त होईल.
मागील वर्षी टेलब्रोस ऑटोमोटिव्ह कॉम्पोनंट्स कंपनीला स्टँडअलोन आणि जेव्ही कंपनीच्या विविध उत्पादन श्रेणींमध्ये 980 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर मिळाल्या होत्या. यापैकी 475 कोटी रुपयेच्या ऑर्डर EV वाहन पुरवठ्यासाठी होत्या. आणि 415 कोटी किमतीच्या ऑर्डर निर्यात संबंधित होत्या. टॅलब्रोस ऑटोमोटिव्ह कंपनीचे 58.43 टक्के भाग भांडवल कंपनीच्या प्रवर्तकानी धारण केले आहे. 41.57 टक्के भाग भांडवल सार्वजनिक गुंतवणूकदारांनी धारण केले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Talbros Auto Share Price NSE Live 19 April 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं