Tata Chemicals Share Price | टाटा केमिकल्स कंपनीने रॅलिस इंडियामध्ये मोठी गुंतवणुक केली, शेअर तेजीत येणार, फायदा घेणार?

Tata Chemicals Share Price | टाटा केमिकल्स कंपनीने आपल्या रॅलिस इंडिया या उप कंपनीचे 97 लाख शेअर्स खरेदी करून 208 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. यासह टाटा केमिकल्स कंपनीचे रॅलिस इंडिया कंपनीमध्ये भाग भांडवल प्रमाण 55.04 टक्केवर पोहचले आहे.
टाटा केमिकल्स कंपनीने मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रॅलिस इंडिया कंपनीचे 97 लाख शेअर्स 215.05 रुपये किमतीवर खरेदी करून मोठी गुंतवणुक केली. आज बुधवार दिनांक 19 जुलै 2023 रोजी टाटा केमिकल्स कंपनीचे शेअर्स 0.075 टक्के घसरणीसह 997.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
टाटा केमिकल्स कंपनीने एका दिवसात रॅलिस इंडिया कंपनीच्या पेडअप भाग भांडवलाच्या 4.99 टक्के शेअर्स खरेदी केले. आणि आता टाटा केमिकल्स कंपनीच्या भाग भांडवलाचे प्रमाण 55.04 टक्के झाले आहे. रॅलिस इंडियाचे 55.04 टक्के भाग भांडवल टाटा केमिकल्स कंपनीच्या मालकीचे आहे. रॅलिस इंडिया ही कंपनी मुख्यतः कृषी क्षेत्रात पीक संरक्षण आणि पोषण पूरक पदार्थांचे उत्पादन, वितरण, विक्री आणि विपणन संबंधित व्यवसाय करते. याशिवाय ही कंपनी पिकांचे बियाणेही विकते.
रॅलिस इंडिया कंपनी नुकताच आपले एप्रिल-जून 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीने तब्बल 63 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. तर जून तिमाहीत रॅलिस इंडिया कंपनीने 765 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. टाटा केमिकल कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 997.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर रॅलिस इंडिया कंपनीचे शेअर्स 2.30 टक्के वाढीसह 220 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Tata Chemicals Share Price today on 19 July 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं