TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS

TATA Motors Share Price | गुरुवार २१ नोव्हेंबरला सुद्धा स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण झाल्याने अनेक कंपन्यांचे शेअर्स (NSE: TATAMOTORS) घसरले होते. गुरुवार 21 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.17 टक्के घसरून 774 रुपयांवर पोहोचला होता. गेल्या महिनाभरात टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 14 टक्क्यांहून अधिक आणि तीन महिन्यांत २८ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. (टाटा मोटर्स कंपनी अंश)
शेअर मार्केटमधील सध्याच्या स्थितीत तुम्ही शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची अपडेट ठरू शकते. ईटी नाऊ वृत्तवाहिनीशी बोलताना मार्केट मार्केट तज्ज्ञांनी टाटा मोटर्स शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे.
टाटा मोटर्स शेअरबाबत तज्ज्ञांचा सल्ला काय
स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी सांगितले की, ‘येत्या वर्षभरात टाटा मोटर्स शेअरचा वेग सकारात्मक बाजूने दिसत असून पुढील १-२ वर्षांत टाटा मोटर्स कंपनी कर्जमुक्त होऊ शकते. टाटा मोटर्स कंपनी कर्जमुक्त झाल्यास त्याचा थेट फायदा टाटा मोटर्सच्या शेअरला होऊन त्यात मोठी तेजी पाहायला मिळू शकते. टाटा मोटर्स शेअरला ७४०-७३० रुपयांवर सपोर्ट आहे, पण साप्ताहिक चार्ट पाहिल्यास असे संकेत दिसत आहेत की, तो इथून घसरल्यास ६०० पर्यंतचा स्तर दाखवू शकतो, असे तज्ज्ञांनी सांगितले. मात्र, एकंदरीत एक वर्षाचा दृष्टीकोन टाटा मोटर्स शेअरसाठी सकारात्मक आहे.
शेअरने 2339% परतावा दिला
मागील १ महिन्यात टाटा मोटर्स शेअर 14.31% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 18.64% घसरला आहे. मागील १ वर्षात टाटा मोटर्स शेअरने 13.54% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात टाटा मोटर्स शेअरने 376.75% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात टाटा मोटर्स शेअरने 2,339.33% परतावा दिला आहे.
टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांकी स्तर 1,179.05 रुपये आणि 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 671.50 रुपये होता. टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 2,84,798 कोटी रुपये आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | TATA Motors Share Price 21 November 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं