Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स तेजीत, नवी टार्गेट प्राईस पाहून गुंतवणूक केल्यास कडक फायदा होईल

Tata Motors Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या ‘टाटा मोटर्स’ कंपनीचे शेअर्स पुन्हा तेजीत आले आहेत. आज गुरूवार दिनांक 23 मार्च 2023 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 0.75 टक्के वाढीसह 419.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये ही तेजी येण्याचे मुख्य कारण म्हणजे कंपनीने 1 एप्रिल 2023 पासून त्यांच्या व्यावसायिक वाहनांच्या किमतीत पाच टक्क्यांची वाढ करण्याची घोषणा केली आहे. (Tata Motors Limited)
कंपनीची घोषणा :
टाटा मोटर्स कंपनीने म्हटले आहे की, 1 एप्रिल 2023 पासून लागू होणाऱ्या BS-VI उत्सर्जन मानदंडांच्या दुसऱ्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर कंपनीने वाहनाच्या किंमतींमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने जाहीर निवेदनात म्हटले आहे की, किमतीतील ही वाढ व्यावसायिक वाहनांच्या संपूर्ण श्रेणीसाठी लागू करण्यात येईल. हे मॉडेल ते मॉडेल वेगवेगळे असेल. टाटा मोटर्स कंपनीच्या व्यावसायिक वाहनांच्या किमती पाच टक्क्यांनी वाढणार आहेत, याचा फायदा कंपनीला होईल, म्हणून कंपनीचे शेअर्स तेजीत आले आहेत.
अनेक ब्रोकरेज फर्म आणि शेअर बाजारातील तज्ञ या कंपनीच्या शेअरबाबत सकारात्मक आहेत. जपानी ब्रोकरेज फर्म नोमुराने टाटा मोटर्स कंपनीच्या स्टॉकवर 508 रुपये टार्गेट किंमत निश्चित केली आहे. अनेक तज्ञांनी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. शेअरखान फर्मने देखील टाटा मोटर्स स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन 516 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Tata Motors share Price BSE 500570 NSE TATAMOTORS on 23 March 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं